IPL 2022 मध्ये विराट कोहली च्या सातत्या ने खराब कामगिरी वर माजी क्रिकेट पटू आकाश चोप्रा ने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. विराट कोहली अशा प्रकारे धावा काढत नाही हे पाहून खूप वाईट वाटते, असे त्याने म्हटले आहे. आकाश चोप्रा च्या म्हणण्या नुसार, कोहली चा खराब फॉर्म पाहून आमच्या डोळ्यात पाणी आले आहे.
आयपीएल च्या या मोसमात विराट कोहली ची बॅट पूर्ण पणे शांत दिसत आहे. एका पाठोपाठ एक डावात मोठी धाव संख्या उभारण्या साठी कोहली धडपडत आहे. या मोसमात आत्ता पर्यंत खेळलेल्या ८ सामन्यात त्याला केवळ ११९ धावा करता आल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटने केवळ दोन सामन्या मध्ये ४० हून अधिक धावा केल्या आहेत. याशिवाय विराट कोहली गेल्या दोन सामन्या पासून सातत्या ने शून्या वर बाद होत आहे. तो येताच पहिल्याच चेंडू वर बाद होतो या वरून त्याचा फॉर्म किती खराब आहे हे दिसून येते.
Ek daur kya harayega usse, jisne haraya zamana hai👑 #aakashvani #viratkohli #shorts #ipl #cricket pic.twitter.com/3Mp5qOBLfO
— Aakash Chopra (@cricketaakash) April 24, 2022
विराट कोहली च्या खराब फॉर्म वर आकाश चोप्रा ने त्याच्या यूट्यूब चॅनल वरील संभाषणात प्रतिक्रिया दिली. तो म्हानाला, विराट कोहली कधी धावा काढणार, तो धावा काढणार की नाही, हा प्रश्न आहे. सलग दोनदा तो गोल्डन डकचा बळी ठरला आहे. या शिवाय तो या मोसमात दोनदा धावबाद झाला आहे. आता आमच्या डोळ्यात अश्रू आले आहेत. मी नेहमी म्हणतो की धोनी, रोहित आणि कोहली हे खेळाडू नाही तर ते आपल्या भावना बनले आहेत. आता तुम्हाला रोहित आणि कोहली दोघांची सहानुभूती मिळू लागली आहे. हे खेळाडू चांगली कामगिरी करतील या आशे वर आम्ही जगतो पण तसे होत नाही. विराट कोहली बद्दल वाईट वाटत आहे.
विराट कोहली आयपीएल मध्ये केवळ ५ वेळा गोल्डन डक वर बाद झाला आहे. ज्या मध्ये तो २००८, २०१४, २०१७ आणि २०२२ मध्ये गोल्डन डक वर आऊट झाला होता. आयपीएल च्या या मोसमात तो दोनदा गोल्डन डक वर बाद झाला आहे. या आधी लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात त्याला खाते ही उघडता आले नव्हते.