रणजी ट्रॉफीमध्ये २३ वर्षीय फलंदाजाने रचला हा इतिहास, असे करणारा ठरला पहिला खेळाडू!

रणजी ट्रॉफी ही भारताची देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा आहे. रणजी ही भारतामध्ये प्रादेशिक क्रिकेट संघटनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघांमध्ये खेळली जाणारी देशांतर्गत प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धा आहे. ही स्पर्धा सध्या २८ संघांमध्ये खेळली जात आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेचे नाव माजी भारतीय क्रिकेटपटू रणजीत सिंग जी किंवा ‘रणजी’ यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. या रणजी ट्रॉफी मध्ये भारताच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू येत असतात आणि आपले कौश्यल्य दाखवून पुढे वाटचाल करत असतात, या मध्ये असाच एक खेळाडूने आपली कामगिरी दाखवत सर्वांचे मन जिंकली आहे.

केरळच्या ने चालू रणजी ट्रॉफीमध्ये खूप प्रसिद्धी मिळवली कारण, २३ वर्षीय फलंदाजाने सलग तीन शतके ठोकली आणि अखेरीस हा टप्पा गाठणारा पहिला केरळचा खेळाडू ठरला. रोहनच्या सलग तिसऱ्या शतकाच्या जोरावर केरळने गुजरातचा आठ गडी राखून पराभव केला.

केरळच्या उजव्या हाताच्या सलामीवीराने २०२१-२२ चा चालू रणजी ट्रॉफी हंगाम नक्कीच गाजवला आहे. त्याचे पहिले शतक फेब्रुवारीमध्ये राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर मेघालय विरुद्ध झाले होते, जिथे त्याने ९७ चेंडूत १७ चौकार आणि एका षटकारासह १०७ धावा केल्या होत्या. मेघालयच्या १४८ धावांच्या प्रत्युत्तरात केरळने पहिल्या डावात५०५/९ धावा केल्या आणि नंतर एक डाव आणि १६६ धावांनी सामना जिंकला.

त्यानंतर याच मैदानावर गुजरातविरुद्धच्या पहिल्या डावात कुन्नुमलने १७१ चेंडूंत १६ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने १२९ धावा केल्या. विष्णू विनोदच्या शतकासह रोहनच्या खेळीमुळे गुजरातचा डाव ३८८ धावांवर आटोपला आणि केरळला४३९  धावा करता आल्या. २१४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहनने ८७ चेंडूंत १२ चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद १०६ धावांची खेळी करत १२१.८४ च्या स्ट्राइक रेटने केरळला आठ गडी राखून विजय मिळवून दिला.

केरळमधील पलक्कड येथे १० मे १९८८ रोजी जन्मलेला रोहन आक्रमक सलामीवीर असून अर्धवेळ ऑफ स्पिन गोलंदाजी करतो. त्याने 3 मार्च २०१७ रोजी भुवनेश्वर येथे विजय हजारे ट्रॉफीमध्ये तामिळनाडू विरुद्ध सीनियर लिस्ट ए मध्ये पदार्पण केले. जानेवारी २०२० मध्ये थुंबा येथे रणजी ट्रॉफीमध्ये राजस्थानविरुद्ध त्याचे प्रथम श्रेणी पदार्पण झाले. टी-२० फॉरमॅटमध्ये रोहनने पदार्पण केले. फेब्रुवारी २०१९ मध्ये मुळापाडू येथे सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत नागालँडविरुद्ध खेळण्यास सुरुवात केली.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप