बॉलीवूड मधील सर्वात मोठी मराठी ऍक्टर रोहिणी हट्टगंडी याच्या जीवनातील भरमसाठ किस्से, त्याचा ६७ वाढदिवस होऊन गेला..!

आपल्या चित्रपट इंडस्ट्रीला लाभलेल्या अनेक अभिनेत्रींपैकी एक नावाजलेल्या अभिनेत्री म्हणजे रोहिणी हट्टंगडी! ज्येष्ठ मराठी अभिनेत्री असलेल्या रोहिणी हट्टंगडी यांनी आतापर्यंत अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलंय. त्याचप्रमाणे बॉलिवूड सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाने त्यांनी वेगळा ठसा उमटवलाय!

रोहिणी हट्टंगडी यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलंय म्हणूनच आता त्यांचा वेगळा परिचय करून देण्याची गरज उरलेली नाही. रोहिणी हट्टगंडी हे चंदेरी अभिनयविश्वातील एक चमचमणारे नाव आहे. त्यांनी हिंदी आणि मराठीत एकापेक्षा एक उत्तम सिनेमे केले आहेत. आपल्या प्रेक्षकांच्या लाडक्या असणाऱ्या अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचा नुकताच ६७ वा वाढदिवस पार पडला आहे.

View this post on Instagram

A post shared by Vicky (@tellywood_south_bollywood)

रोहिणी हट्टंगडी यांचा जन्म ११ एप्रिल १९५५ रोजी पुण्यात झाला. त्यांना पूर्वीपासूनच अभिनयाची आवड होती आणि आपण अभिनेत्रीच व्हायचं हे त्यांनी आधीच ठरवलं होतं. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोहिणी हट्टंगडी यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये (NSD) प्रवेश घेतला. याबरोबरच त्यांनी शास्त्रीय नृत्य कथकली आणि भरतनाट्यम हे दोन्ही प्रकार शिकल्या. रोहिणी हट्टंगडी यांच्या भूमिकांबद्दल सांगायचं झाल्यास त्यांनी गांधी, सारांश, पार्टी, अग्निपथ, अर्थ आणि पुकार यासह अनेक सिनेमांमध्ये उत्कृष्ट अभिनयाची छाप सोडली आहे. मुन्नाभाई एमबीबीएसमध्येही त्यांनी संजय दत्तच्या आईची भूमिका निभावली होती. आणि ती लोकांच्या विशेष पसंतीसही उतरली होती.

घातक आणि चालबाज यांसारख्या सिनेमांमधील त्यांच्या बहारदार अभिनयासाठीही त्या प्रसिद्ध आहेत. रोहिणी हट्टंगडी यांच्या पर्सनल लाईफ बद्दल बोलायचं झाल्यास त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे बॅचमेट असलेल्या जयदेव हट्टंगडी यांच्याशी लग्नगाठ बांधली. मात्र, २००८ साली जयदेव हट्टंगडी यांचा कर्करोगाने मृत्यू झाला. या दोघांना असीम हट्टंगडी नावाचा मुलगा असून तो देखील बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. दरम्यान, जयदेव यांच्याशी लग्न केल्यानंतर रोहिणी हट्टंगडी यांनी आपल्या नवऱ्यासोबत मराठी नाट्यसमूह स्थापन करून त्या अंतर्गत १५० पेक्षा जास्त नाटकं सादर केली.

त्यानंतर मात्र रोहिणी हट्टंगडी यांनी हळूहळू छोटा पडदा म्हणजेच टीव्हीवर पदार्पण केले आणि १९७८ मध्ये बॉलिवूड सिनेसृष्टीत पदार्पण केले. सईद अख्तर मिर्झा निर्मित अरविंद देसाई यांचा ‘अजीब दास्तान’ हा त्यांचा पहिला सिनेमा होता. १९८२ मध्ये प्रदर्शित झालेला ‘गांधी’ हा त्यांचा प्रथम आंतरराष्ट्रीय सिनेमा होता. या चित्रपटाने त्यांना प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन पोहोचवले. रोहिणी हट्टंगडी या अशा कलाकार आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपटांत देखील काम करून नाव कमावलं आहे! तसेच तेव्हा बाफ्टा अवॉर्ड (Bafta Award) जिंकणाऱ्या त्या पहिल्या आणि एकमेव अभिनेत्री ठरलेल्या!

त्यांच्या पुरस्कारांबद्दल बोलायचं झाल्यास रोहिणी हट्टंगडी यांनी त्यांच्या सिनेकारकिर्दीत दोन फिल्मफेअर आणि एक राष्ट्रीय पुरस्कार आपल्या नावावर केले आहेत! याशिवाय रोहिणी यांना ‘गांधी’ चित्रपटासाठी सहाय्यक भूमिकेसाठी बाफ्टा पुरस्कारही मिळालेला आहे. आतापर्यंत त्यांनी ७० पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केले आहे आणि त्यातील प्रत्येक भूमिकेसाठी त्यांचं विशेष कौतुक देखील झालंय!

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप