सध्या टॉलीवूड पासून बॉलिवूड पर्यंत पुष्पा सिनेमाचा बोलबाला सगळीकडे होताना दिसतोय! यामध्ये आपले हॉलिवूड स्टार्स देखील मागे नाहीत! पुष्पा फेव्हर दिवसेंदिवस जगभर वाढताना दिसत आहे. पुष्पा सिनेमातली गाणी, त्यातले अल्लू अर्जुनचे गाजलेले डायलॉग या सर्वांवरती रिल्स आणि व्हिडिओ बनवत लोकांनी सोशल मिडियावर चौफेर नुसता धुमाकूळ घातला आहे! अल्लू अर्जुन त्याचा लूक, त्याचे डायलॉग, त्याची स्टाईल यासर्वांची जोरदार चर्चा होत आहे. पुष्पां सिनेमावर चहुबाजूंनी कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. पुष्पां चित्रपटाला एवढ्या प्रसिद्धीच्या शिखरावर नेण्यासाठी अल्लू अर्जुन प्रमाणेच इतर सहकलाकारांनी देखील तेवढीच मेहनत घेतली आहे.
View this post on Instagram
‘पुष्पा’ ( Pushpa ) हा अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) सिनेमा रिलीज होऊन दीड महिना झाला, पण अजूनही या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. अल्लू अर्जुनचा हा सिनेमा लोकांनी डोक्यावर घेतलाच. पण या सिनेमातील गाणीही डोक्यावर घेतली. अगदी सिनेमाचे डायलॉग्सही गाजलेत. चित्रपटातील कलाकारही सर्वत्र चर्चेत आलेत. मग तो अल्लू अर्जुन असो, रश्मिका मंदाना असो की, पुष्पाचा मित्र केशव असो की पुष्पाची आई! सर्वांनी जीव ओतून काम करत आपल्या भूमिकेला ‘चार चांद’ लावलेत!
पुष्पाच्या आईची भावुक कहाणी मनं हेलावून सोडते. चित्रपटाच्या कथानकाला नुसार इमोशनल टच देण्यासाठी ‘पुष्पा’ या सिनेमात पुष्पराज व त्याच्या आईची इमोशनल कहाणी जोडली आहे. पुष्पा आईसोबत एका झोपडीत राहत असतो. गावातील एका प्रतिष्ठित विवाहित पुरूषाच्या प्रेमसंबंधातून पुष्पाचा जन्म झाला असतो. वडीलांच्या मृत्यूनंतर पुष्पाला पदोपदी अनौरस म्हणून हिणवलं जातं. त्याच्या आईला अनेक वेळा अपमानास्पद प्रसंगाना सामोरं जावं लागतं. वडिलांचं नाव माहित असूनही ते आपल्या नावापुढे न लावू शकणारा पुष्पा आणि त्याच्या आईची स्टोरी दोघांच्या ही दमदार नैसर्गिक अभिनयाचे मुळे प्रेक्षकांच्या डोळ्यांत पाणी आणल्यावाचून राहात नाही!
यात पुष्पाच्या आईची ही भूमिका कोणी साकारली आहे, तुम्हाला माहित आहे? पुष्पांच्या आईची भूमिका साऊथ अभिनेत्री कल्पलता (Kalpalatha) हिने साकारली आहे. आज याच कल्पलता बद्दलची माहिती आम्ही तुम्हाला आमच्या या लेखातून सांगणार आहोत. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण या चित्रपटात अल्लू अर्जुनच्या आईची भूमिका साकारणारी ही कल्पलता फक्त ४२ वर्षांची आहे. म्हणजे अल्लू अर्जुनपेक्षा फक्त तीन वर्षांनी मोठी़!!
View this post on Instagram
रिअल लाईफमध्येही कल्पलता दोन मुलींची आई आहे. तिच्या दोन्ही मुली नोकरी करतात. कल्पलताने ५० पेक्षा अधिक साऊथ सिनेमांमध्ये काम केलं आहे. अनेक मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. खऱ्या आयुष्यात कल्पलता १४ वर्षांची असतानाच तिचं लग्न झालं होतं. सोशल मीडियावर कल्पलता कमालीची अॅक्टिव्ह असलेली दिसते. तिचे इन्स्टा अकाऊंट पूर्णपणे ग्लॅमरस फोटोंनी भरलेलं आहे. हे फोटो पाहून हीच पुष्पातील अल्लू अर्जुनची आई आहे, यावर क्षणभर कोणाचाही विश्वास बसणार नाही.!