टीम इंडियाला विश्वचषक जिंकून देणारा हा फलंदाज करणार होता चक्क आ’त्महत्या..! नाव जाणून तुम्हाला हि धक्का बसेल..!

T-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा भाग असलेला यष्टिरक्षक फलंदाज रॉबिन उथप्पाने खुलासा केला आहे की, २००९ ते २०११ दरम्यान तो त’णावाशी लढत होता आणि एक वेळ अशी आली होती की त्याने आ’त्महत्या करण्याचा विचारही केला होता. उथप्पाने २००६ मध्ये इंग्लंडविरुद्ध भारतीय संघात पदार्पण केले होते. त्याने भारतासाठी आतापर्यंत ४६ एकदिवसीय आणि १३ टी-२० सामने खेळले आहेत.

एनएस वाहिया फाऊंडेशन आणि मॅक्लीन हॉस्पिटल (हॉवर्ड मेडिकल स्कूलशी संलग्न) यांच्या संयुक्त विद्यमाने राजस्थान रॉयल्स फाउंडेशनने आयोजित केलेल्या मानसिक आरोग्यावरील ‘माइंड, बॉडी अँड सोल’ वेबिनारच्या पहिल्या सत्रात उथप्पा म्हणाला, जेव्हा मी २००६ मध्ये पदार्पण केले तेव्हा असे झाले होते. मला स्वतःबद्दल जास्त माहिती न्हवते तेव्हा खूप काही शिकत होतो आणि सुधारत होतो. आता मला माझ्याबद्दल बरेच काही माहित आहे आणि माझ्या विचारांबद्दल मला खात्री आहे. आता माझी काळजी घेणे माझ्यावर अवलंबून आहे की मी कुठेतरी घसरलो तर हे सोपे आहे.

तो म्हणाला, मला आज या ठिकाणी पोहोचल्यासारखं वाटतंय कारण मी खूप कठीण क्षणांचा सामना केला आहे. मी खूप त’णावाखाली होतो आणि माझ्या मनात आ’त्महत्या करण्याचा विचार येत होता. मला २००९ आणि २०११ सालची ही दिनचर्या आठवते. मला रोज असे विचार यायचे.

उथप्पा पुढे म्हणाला, एक काळ असा होता जेव्हा मी क्रिकेटचा विचारही केला नव्हता. ते माझ्या मनापासून खूप दूर होते. मी आज कसा टिकून राहू आणि दुसऱ्या दिवसापर्यंत कसा जगेन याचा विचार करत राहिलो. काय होत आहे माझ्या आयुष्यात आणि मी कोणत्या मार्गाने जात आहे?

क्रिकेट खेळताना असे विचार माझ्या मनातून दूर असायचे, पण ऑफ सीझनमध्ये जेव्हा एकही सामना नसतो तेव्हा ते खूप अवघड होते. त्या दिवसांत मी बसून विचार करायचो की मी तीन पर्यंत मोजून पळत जाईन मी बाल्कनीतून उडी मारेन, पण नंतर काहीतरी मला ते करण्यापासून रोखत होते. २००५ मध्ये चॅलेंजर ट्रॉफीमध्ये भारत अ संघाविरुद्ध भारत ब संघासाठी ६६ धावा केल्या तेव्हा उथप्पा तेव्हा पहिल्यांदा लोकांच्या नजरेत आला होता. पुढच्या वर्षी याच स्पर्धेत उथप्पाने त्याच संघाविरुद्ध ९३ चेंडूत १०० धावा केल्या होत्या.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप