IPL २०२२ चा अंतिम सामना २९ मे (रविवार) रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळवला गेला होता. ज्यामध्ये गुजरात टायटन्सने बाजी मारली आहे. गुजरात टायटन्सचे लीगमधील हे पहिलेच वर्ष असून या संघाने हा सिजन त्यांच्या नावे केला आहे. राजस्थान २००८ चा चॅम्पियन संघ आहे, म्हणजेच आयपीएलचे पदार्पण वर्ष. १४ वर्षांनंतर राजस्थान संघ फायनल मध्ये पोहोचला होता.
आयपीएल २०२२ च्या विजेत्या संघाला केवळ चमकदार ट्रॉफीच मिळणार नाही, तर बक्षीस म्हणून मोठी रक्कमही दिली जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएल २०२२ च्या चॅम्पियन टीमला २० कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळेल. तर अंतिम फेरीत पराभूत होणाऱ्या संघाला १३ कोटी रुपये मिळेल. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही रक्कम ५० लाख रुपये अधिक आहे. गेल्या वर्षी उपविजेते पदा साठी कोलकाता नाईट रायडर्सला १२.५० कोटी रुपये मिळाले होते. त्याचबरोबर विजेतेपद पटकावणाऱ्या संघाच्या बक्षीस रकमेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. चेन्नई सुपर किंग्जला गेल्या वर्षी विजेतेपद पटकावल्या नंतर २० कोटी रुपये मिळाले होते. यावेळीही विजेत्या संघाला बक्षीस म्हणून समान रक्कम मिळणार आहे.
View this post on Instagram
याशिवाय प्लेऑफ खेळणाऱ्या उर्वरित संघांवरही पैशांचा पाऊस पडला आहे. तिसऱ्या क्रमांकावरील संघाला (क्वालिफायर-२ पराभूत) ७ कोटी रुपये आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघाला ६.५ कोटी रुपये बक्षीस रक्कम म्हणून मिळेल. म्हणजेच राजस्थान रॉयल्सविरुद्ध क्वालिफायर-२ गमावलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ७ कोटी आणि लखनऊ सुपर जायंट्सला ६.५ कोटी मिळतील. गेल्या ४ वर्षांपासून विजेत्या संघाला बक्षीस म्हणून २० कोटी रुपये मिळत आहेत. आयपीएलमधील विजेत्या आणि उपविजेत्या संघांना मिळालेल्या बक्षीस रकमेशिवाय आणखी अनेक पुरस्कार दिले जातात. यामध्ये ऑरेंज कॅप, पर्पल कॅप यासारख्या पुरस्कारांचा समावेश आहे.
आयपीएल ऑरेंज कॅप: हा पुरस्कार आयपीएलच्या संपूर्ण हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला दिला जातो. यावेळी राजस्थान रॉयल्सचा फलंदाज जोस बटलर या शर्यतीत आघाडीवर आहे. ऑरेंज कॅप विजेत्याला १५ लाख रुपये दिले जातात.
आयपीएल पर्पल कॅप: आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते. यावेळी राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज चहल या शर्यतीत आघाडीवर आहे. पर्पल कॅप विजेत्याला १५ लाख रुपये दिले जातात.