या २ खेळाडूंचे आयपीएल मधील योगदान कधीही विसरता येणार नाही, कर्म हि धर्म आहे त्याची वृत्ती..!

आयपीएल सुरू झाल्या पासून आता पर्यंत अनेक खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. २००८ ते २०२२ च्या सिजन पर्यंत जगातील अनेक बड्या खेळाडूंनी आयपीएल मध्ये भाग घेऊन नाव कमावले आहे. याशिवाय भारतातील अनेक क्रिकेटपटूंना ही आयपीएल मुळे उत्तम व्यासपीठ मिळाले आहे. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे मुंबई इंडियन्सचा संघ, ज्याने भारताला हार्दिक पांड्या सारखा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू दिला आहे. दुसरीकडे, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह भारतीय क्रिकेट मध्ये खूप मोलाचा ठरत आहे. चेन्नई सुपर किंग्ज मधून अंबाती रायुडू, शार्दुल ठाकूर आणि दीपक चहर सारख्या खेळाडूंनी ही आयपीएल मधील उत्कृष्ट कामगिरी च्या जोरा वर भारतीय संघाची जर्सी परिधान करण्याचा मान मिळवला आहे.

मात्र आयपीएल मध्ये केवळ तेच क्रिकेट पटू दीर्घकाळ स्मरणात राहतात जे एकतर दीर्घकाळ या स्पर्धेचा भाग आहेत किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करतात. याशिवाय असे काही खेळाडू आहेत ज्यांनी आयपीएल मध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे व त्यांचे योगदान विसरता येणार नाही. आम्ही तुम्हाला अशाच दोन दिग्गज खेळाडूं बद्दल सांगणार आहोत.

स्वप्नील असनोदकर- राजस्थान रॉयल्स: या यादीतील पहिला खेळाडू म्हणजे स्वप्नील असनोदकर. उत्कृष्ट स्ट्रोक- प्लेअर म्हणून ओळखला जाणारा, स्वप्नील असनोदकर आयपीएल २००८ मध्ये राजस्थान रॉयल्सचा भाग होता.

राजस्थान ने आयपीएल चे पहिले विजेते पद पटकावले होते, ज्यामध्ये या फलंदाजाचा मोठा वाटा होता. राजस्थान च्या सलामीचा प्रश्न सोडवण्याचे काम गोव्याच्या या फलंदाजाने केले होते. या पूर्वी कर्णधार शेन वॉर्न ने अनेक पर्याय आजमावले होते पण प्रत्येक प्रश्नाचे उत्तर असनोदकर होता. त्याने ग्रॅमी स्मिथ सोबत नियमितपणे डावाची सुरुवात केली आणि ९ सामन्यात ३४.५५ च्या सरासरीने २ अर्धशतकांसह ३११ धावा केल्या होत्या.

View this post on Instagram

A post shared by S.Badrinath (@s_badrinath)

सुब्रमण्यम बद्रीनाथ – चेन्नई सुपर किंग्स


बद्रीनाथ हे देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात प्रसिद्ध नावांपैकी एक आहे. ९५ आयपीएल सामन्यांमध्ये त्याने ३०.६६ च्या सरासरीने १४४१ धावा केल्या, ज्यामध्ये अनेक मॅच-विनिंग इनिंगचा समावेश आहे. २०१० आणि २०११ मध्ये चेन्नईच्या सलग दोन IPL विजेतेपदांचा एक भाग असल्याने तामिळनाडूचा फलंदाज CSK कॅम्पचा प्रमुख सदस्य होता. बद्रीनाथने अनेक प्रसंगी संघासाठी समस्या निवारणकर्त्याची भूमिका बजावली होती. संघात दिग्गज खेळाडूंच्या उपस्थिती मुळे आणि चांगले फिनिशर असल्यामुळे त्याची कामगिरी सतत घसरत राहिली. मात्र त्याचे योगदान कधीही विसरता येणार नाही.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप