मित्रांनो, आपण सर्वच आयपीएलचे चाहते आहोत आणि जेव्हा देशात आयपीएल सुरू होते, तेव्हा वेगळे काही विशेष उरत नाही. आयपीएल हा राष्ट्रीय स्तरावरील खेळ आहे जो दरवर्षी देशात आयोजित केला जातो. अनेक भारतीय खेळाडूंसोबतच अनेक परदेशी खेळाडूही आयपीएलमध्ये सहभागी होतात. कोरोनाच्या काळात बहुतांश खेळांचे सामने रद्द झाले होते, तेव्हाही लॉकडाऊनच्या मध्यावर यूएईमध्ये आयपीएल सामन्याचे आयोजन करण्यात आले होते आणि यावेळीही आयपीएलला लोकांचे भरभरून प्रेम मिळाले. यंदाची आयपील अधिकच मनोरंजक होणार आहे कारण, या वर्षी ८ नाही तर १० संघ मैदानात उतरणार आहेत आणि त्या मध्ये अनेक नवे चहरे आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियापासून दूर आहे. खराब तंदुरुस्ती आणि फॉर्ममुळे हार्दिक पांड्या बराच काळ क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता, मात्र आता तो कर्णधार म्हणून पुनरागमन करणार आहे. हार्दिक पांड्याला आयपीएलमध्ये प्रथमच कर्णधारपदाची संधी मिळाली आहे, जिथे त्याला गुजरात टायटन्स या नवीन संघाने नियुक्त केले आहे, तो आयपीएलच्या या हंगामात प्रथमच खेळत आहे. तसेच, आयपीएलमध्ये पहिल्यांदाच कर्णधारपद भूषवणाऱ्या हार्दिक पंड्यावर गुजरात टायटन्सच्या संचालकाने मोठ वक्त्यव्य केले आहे. चला तर मग पाहूया काय म्हणाला गुजरात टायटन्स च्या संचालक.
View this post on Instagram
टायटन्सचे संचालक विक्रम सोलंकी यांचा हार्दिकवर विश्वास आहे. हार्दिक पांड्याला कर्णधारपदाचा कोणताही अनुभव नसला आणि त्याच्या कर्णधारपदावर अनेकांना शंका असली, तरी गुजरात टायटन्सचे क्रिकेट संचालक विक्रम सोलंकी यांना हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदावर पूर्ण विश्वास आहे. आयपीएलमध्ये पहिल्यांदाच कर्णधारपद भूषवणाऱ्या हार्दिक पंड्यावर गुजरात टायटन्सच्या संचालकाचा विश्वास आहे असे ते म्हणाले.
भारतीय संघ आणि मुंबई इंडियन्समध्ये असताना हार्दिकने महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांसारख्या सर्वोत्तम कर्णधारांकडून खूप काही शिकले आहे आणि एक चांगला कर्णधार बनण्याचे सर्व गुण त्यांच्यात आहेत, असे मत माजी इंग्लिश क्रिकेटपटू विक्रम सोलंकी यांनी व्यक्त केले. धोनी, विराट, रोहित यांच्याकडून हार्दिकला खूप काही शिकायला मिळाले द टेलिग्राफशी बोलताना विक्रम सोलंकी म्हणाले, “आम्हाला हार्दिकमध्ये असे गुण दिसतात जे त्याला यशस्वी आणि उत्कृष्ट कर्णधार बनवू शकतात. जोपर्यंत आयपीएल विजेतेपदाचा संबंध आहे, आम्ही त्याच्या ट्रॅक रेकॉर्डबद्दल अनेकदा बोललो आहोत.
गुजरात टायटन्सचे संचालक विक्रम सोलंकी पुढे म्हणाले, “तो आमच्या नेतृत्व गटाचा एक भाग आहे आणि रोहित शर्मा, विराट कोहली आणि एमएस धोनी यांसारख्या इतर कर्णधारांकडून त्याने बरेच काही शिकले आहे. कर्णधार म्हणून स्वत:ला विकसित करण्यासाठी तो या सर्व शिकण्याचा उपयोग करेल.”