आयपीएल २०२२ भारतात सुरू झाले आहे आणि यावेळेस आयपीएलची वाटचाल जबरदस्त आहे, पण आता एक वाईट बातमी आयपीएल दर्शकांसाठी समोर आली आहे. केएल राहुलच्या गोलंदाजाला दुखापतीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जॉइंट्स संघात हा वेगवान गोलंदाज सामील होता.
पण नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, आता हा गोलंदाज संपूर्ण आयपीएल स्पर्धेत खेळू शकणार नाही. या गोलंदाजाचे नाव आहे मार्क वुड. लखनऊच्या टीमने ७.५० कोटी रुपयांमध्ये मार्क वुडला खरेदी केले होते. मात्र शस्त्रक्रियेनंतर तो आता या संपूर्ण आयपीएल हंगामात खेळणार नाही. इंग्लंडच्या या तगड्या गोलंदाजाने आपल्या कोपराच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतरचा एक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
View this post on Instagram
वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान मार्क वुड कोपराच्या दुखापतीमुळे खूप अस्वस्थ झाला होता. या कारणास्तव तो एंटीगुआ मधील दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान अर्ध्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला. नंतर या दुखापतीमुळे त्याला आयपीएल २०२२ मधून बाहेर व्हावे लागले तेव्हा प्रेक्षकांना आणि खुद्द मार्क वुडला सर्वात मोठा धक्का बसलाआहे, पण आता लखनऊ संघाने मार्क वुडच्या जागी अँड्र्यू टायचा समावेश केला आहे.
मात्र, आता मार्क वुडने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत शस्त्रक्रिया पूर्ण झाल्याची घोषणा केली असून, रुग्णालयातीलच एक व्हिडिओ आणि फोटोही शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मार्क वुड खूपच मजेशीर अंदाजात दिसत आहे. दुसरीकडे तो पुष्पा स्टाईल मध्ये असे हि म्हणाला कि “झुकेगा नही साला” पुढे तो म्हणाला मी अजूनही गोलंदाजी करू शकतो, मला या वर्षी आयपीएल खेळता आले नाही याचे खूप दुःख आहे.
View this post on Instagram
मग मार्क वुड, स्टुअर्ट ब्रॉड, जोस बटलर, सॅम बिलिंग्ज आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी शेअर केलेली ही पोस्ट पाहिल्यानंतर काही मजेदार प्रतिक्रिया शेअर केल्या. मित्रांनो तुम्हाला सांगायचे आहे की मार्क वुड हा इंग्लंड क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये एक खास गोलंदाज म्हणून उदयास आला आहे. याशिवाय मार्क वुड १४५ किमी प्रतितास वेगाने सतत गोलंदाजी करण्यासाठी देखील प्रसिद्ध आहे.
एशियन मालिकेदरम्यान मार्क वुडने खूप धमाकेदार कामगिरी दाखवली. मात्र, यादरम्यान त्यांच्या संघाला ४.० ने पराभवाला सामोरे जावे लागले. पण मार्क वुडची कामगिरी बघितली तर त्याने एशियन मालिकेत १७ विकेट घेतल्या.