वडील केस कापण्याचे दुकान चालवतात आणि मुलगा आयपीएल डेब्यू मध्ये झाला हिरो..!

लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) विरुद्ध च्या सामन्यात राजस्थान रॉयल्स (आरआर) कडून खेळणाऱ्या कुलदीप सेनने अखेर च्या षटकात संघाला विजय मिळवून दिला होता. पहिल्याच सामन्यात हा पराक्रम केल्या नंतर कुलदीप सेन रातो रात हिरो बनला आहे. त्याच्या बद्दल जाणून घेण्या साठी चाहते ही उत्सुक आहेत.

कुलदीप सेन हा मूळचा मध्य प्रदेशचा असून त्याचा जन्म २२ऑक्टोबर १९९६ रोजी रीवा येथे झाला होता. २०१८ मध्ये तामिळनाडू विरुद्ध च्या रणजी ट्रॉफी सामन्यातून त्याने मध्य प्रदेश साठी प्रथम श्रेणी क्रिकेट मध्ये पदार्पण केले होते. त्याने नोव्हेंबर २०१८ मध्ये पंजाब विरुद्ध पहिल्यांदा ५ विकेट घेतल्या होत्या. T- २० क्रिकेट मध्ये त्याने २०१९ मध्ये इंदूर मध्ये मुंबई विरुद्ध खेळला होता. गेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी मध्ये त्याने मध्य प्रदेश कडून ५ सामने खेळले होते त्यात त्याने ४ बळी घेतले होते.

आयपीएल च्या मेगा लिलावात त्याला राजस्थान रॉयल्स ने त्याच्या मूळ किमतीत विकत घेतले होते. तो २० लाखा च्या मूळ किमतीत राजस्थान रॉयल्स संघात सामील झाला होता. सेनचे वडील हेअर कटिंग सलून मध्ये काम करतात. घरच्यांनी त्याला क्रिकेट न खेळण्याचा सल्ला दिला होता पण तो खेळत राहिला हीच त्याची आवड होती.

विशेष म्हणजे राजस्थान रॉयल्स विरुद्ध च्या सामन्यात लखनौ च्या संघाला शेवट च्या षटकात १५ धावांची गरज होती. संजू सॅमसन ने नवीन गोलंदाज कुलदीप सेनकडे चेंडू सोपवला आणि त्या नंतर गोष्टी खास बनल्या. मार्कस स्टॉइनिस फलंदाजी करत असताना सेन ने त्याला १५ धावा करण्या पासून रोखले. राजस्थान रॉयल्स ने हा सामना ३ धावां च्या फरकाने जिंकला आणि २ महत्त्वाचे गुण मिळवले. अशा प्रकारे कुलदीप सेन रातो रात हिरो बनला आहे.

वडील रामपाल सेन यांनी सांगितले की, माझ्याकडे फोन नसल्याने मी त्याच्या शी थेट बोलत नाही. तो त्याच्या आई आणि भावंडांशी बोलतो. लोक आम्हाला संदेश पाठवतात. तो चांगला खेळला तर निवडकर्त्यांची त्याच्यावर नजर पडेल, त्या नंतर भारतीय संघात निवड होईल. तो त्याची समस्या आई सोबत शेअर करतो.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप