पहा विराट च्या गोंडस वामिकाची पहा पहिली झलक, सामन्यांमध्ये दिसली आई सोबत..!

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी ११ जानेवारी २०२१ रोजी त्यांच्या मुलीचे आयुष्यात स्वागत केले होते. आपल्या मुलीच्या जन्मामुळे दोघेही खूप आनंदी  झाले होते. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या मुलीच्या जन्मा पासूनच चाहते त्यांच्या मुलीची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक होते आणि आता या दोघांनीही त्यांच्या चाहत्यांची इच्छा पूर्ण केली आहे.

सामन्या दरम्यान विराट कोहलीची मुलगी वामिकाची पहिली झलक सगळ्यांना पाहायला मिळाली. विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा तिची मुलगी वामिकासह स्टँडवर उभी होती तेव्हा कॅमेरा तिच्याकडे केल्यानंतर वामिका व अनुष्का दिसली.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना खेळला जात आहे. टीम इंडियाने प्रथम गोलंदाजी केली आहे, दक्षिण आफ्रिका संघाच्या इनिंग दरम्यान, टीव्ही स्क्रीनवर असे काही दिसले ज्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत होते.

या सामन्यादरम्यान विराट कोहलीची मुलगी वामिकाची पहिली झलक सर्वांना पाहायला मिळाली. विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा तिची मुलगी वामिकासह स्टँडवर उभी होती तेव्हा कॅमेरा तिच्याकडे वळला तेव्हा गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान करून वामिका तिची आई अनुष्काच्या मांडीवर होती. विराट कोहलीची मुलगी वामिकाची झलक पहिल्यांदाच दिसली आहे.

सुरुवातीपासूनच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्याकडून सांगण्यात आले होते की, त्यांना त्यांच्या मुलीला या गोष्टी समजेपर्यंत सोशल मीडियाच्या जगापासून दूर ठेवायचे आहे. विराट कोहली- अनुष्का शर्मा यांची मुलगी वामिका कोहली जानेवारीतच १ वर्षाची झाली आहे.

टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामना खेळत असताना वामिकाचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याशिवाय विराट कोहली जेव्हा केपटाऊनमध्ये पहिला कसोटी सामना खेळत होता, त्यावेळीही तो आपली मुलगी वामिकाला मैदानातून हात करताना दिसला होता, ज्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता.

स्वतः विराटने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना मुलीच्या जन्माची माहिती दिली होता. या पोस्टमध्ये त्यांनी फक्त कॅप्शन मध्ये लिहिले होते, त्यामध्ये मुलीचा चेहरा दाखवला न्हवता. त्यांनी लिहिले होते की, तुमच्या प्रेमासाठी आणि शुभेच्छांसाठी आम्ही मनापासून आभारी आहोत.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप