IPL २०२२ सीझनचा पहिला सामना CSK आणि KKR यांच्यात होणार, महाराष्ट्र सरकारने दिली मोठी बातमी..!

आयपीएल २०२२ चा मेगा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बेंगळुरू येथे आयोजित करण्यात आला होता, लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाल्या मुळे चाहते १५ व्या हंगामाची वाट पाहत आहेत. आता असे बोलले जात आहे की हा नवा सीझन २६ मार्चपासून सुरू होऊ शकतो. वृत्तानुसार, सीझनचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवला जाऊ शकतो.

१५ व्या हंगामात ८ ऐवजी १० संघ खेळताना दिसणार आहेत. यावेळी बीसीसीआय ने भारतातच आयपीएल २०२२ चे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बीसीसीआय ने मुंबई आणि पुण्याच्या चार मैदानांवर सामने खेळवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे, व नॉकआउट सामने अहमदाबाद मध्ये होणार आहेत. या मोसमातील पहिला सामना गेल्या वर्षीच्या अंतिम फेरीतील फाइनलिस्ट मध्ये होणार आहे.

पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) हे संघ आमने सामने दिसणार आहेत. जिथे IPL विजेत्या चेन्नईला ही लय कायम ठेवायची आहे. या मोसमातील सामने वानखेडे, ब्रेबॉर्न आणि डी.वाय.पाटील स्टेडियम तसेच पुण्याच्या मैदानावर होणार आहेत. ज्या मध्ये ५५ सामने मुंबईच्या मैदानावर तर १५ सामने पुण्यात होणार आहेत. वृत्तानुसार, BCCI आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात IPL २०२२ च्या आयोजना बाबत बैठक झाली होती. मुंबई क्रिकेट असोसिएशन च्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष नार्वेकर म्हणाले की, आम्ही बीसीसीआयला पूर्ण पाठिंबा देऊ.

त्याबद्दल ते म्हणाले की- खेळाडूंना हॉटेल, प्रशिक्षण स्थळ आणि स्टेडियम मध्ये जाण्यास कोणतीही अडचण येऊ नये यासाठी महाराष्ट्र सरकार स्पर्धे दरम्यान संघांना स्वतंत्र लेन उपलब्ध करून देईल. प्रेक्षकांना मैदानावर परवानगी द्यायची की नाही याचा निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार आहेत. २६ मार्च पासून आयपीएल च्या १५ व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. गुरुवारी आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल च्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला होता. याआधी स्पर्धेचा उद्घाटन सामना २७ मार्चला होणार असल्याचे बोलले जात होते, मात्र ब्रॉडकास्टर च्या मागणी नुसार बीसीसीआयने २६ मार्च ही तारीख निश्चित केली आहे.

२०११ प्रमाणे यावेळी १० संघ दोन गटात विभागले जाणार आहेत. अ गटात पाच संघ आणि ब गटात पाच संघ असतील. एका संघाला गट फेरीत किमान १४ सामने खेळावे लागणार आहे. तुमच्या गटात एकमेकांविरुद्ध दोनदा खेळण्याची संधी मिळेल. दुसऱ्या गटातील कोणत्याही एका संघा विरुद्ध दोन सामने खेळवले जातील. यानंतर दुसऱ्या गटातील उर्वरित चार संघांना प्रत्येकी एक सामना खेळावा लागणार आहे.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप