इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात सर्वाधिक विजेतेपद पटकावणारा संघ मुंबई इंडियन्स ची १५ व्या मोसमात दयनीय अवस्था झाली आहे. आयपीएल च्या या मोसमात मुंबई इंडियन्स संघ सतत संघर्ष करत असून, आता पर्यंत खेळलेल्या ५ सामन्या पैकी एकही सामना त्यांना जिंकता आलेला नाही. मुंबई इंडियन्स ची खराब कामगिरी लागातार सुरूच आहे, जिथे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आयपीएल मधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स च्या या खराब कामगिरी वर अनेक दिग्गजांना बोलण्याची संधी मिळाली आहे.
या चालू हंगामात, अनेक क्रिकेट दिग्गज मुंबई इंडियन्स च्या कामगिरी वर उघड पणे त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत, ज्या मध्ये काही मुंबई इंडियन्स च्या चुका सांगत आहेत, तर काही त्यांच्या रणनीती बद्दल बोलत आहेत. यादरम्यान, आता माजी ऑस्ट्रेलिया क्रिकेट चा भाग असलेला शेन वॉटसन आणि या हंगामात दिल्ली कॅपिटल्स च्या कोचिंग स्टाफने आपले मत मांडले आहे. शेन वॉटसन ने इशान किशन वर मोठ्या प्रमाणात पैसे लावल्या बद्दल टीका केली आहे.
View this post on Instagram
शेन वॉटसन ने द ग्रेड क्रिकेटर ला दिले ल्या मुलाखतीत सांगितले की, मुंबई इंडियन्स पॉइंट टेबलच्या तळाशी आहे याचे मला अजिबात आश्चर्य वाटत नाही कारण लिलाव त्यांच्या साठी खूप धक्का दायक होता. त्यांनी इशान किशन वर खूप पैसा खर्च केला होता. तो खूप चांगला खेळाडू आहे पण असे असून ही किशन वर इतके पैसे खर्च करणे बरोबर न्हवते. तसेच तो या मोसमात येऊन खेळेल की नाही याचा विचार न करता त्यांनी जोफ्रा आर्चर वर बरेच पैसे खर्च केले. आर्चर ने बरेच दिवस क्रिकेट खेळलेले नाही.
त्याच वेळी, शेन वॉटसन ने या हंगामात ५ पैकी ४ सामने गमावलेल्या त्याच्या माजी संघ चेन्नई सुपर किंग्जवर देखील भाष्य केले. तो म्हणाला, मी CSK चे पाच सामने पाहिले आहेत. त्याच्या कडे वेगवान गोलंदाजीची कमी आहे. गेल्या मोसमा पर्यंत त्यांच्या कडे शार्दुल ठाकूर होता. दीपक चहर जखमी झाला आहे. त्यांनी दीपक वर खूप पैसा खर्च केला आहे पण त्याला स्पर्धेच्या मोठ्या भागा दरम्यान उपलब्ध होणे कठीण वाटते (दीपक चहर संपूर्ण हंगामा साठी बाहेर आहे) ही एक मोठी समस्या आहे.