‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील स्वाती पानसारे ने दिला चाहत्यांना खूप मोठा आनंदाचा धक्का, झळकणार मोठ्या पडद्यावर..!

झी मराठीवरील कमी काळात प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी झालेली मालिका म्हणजे माझी तुझी रेशीमगाठ! आता या मालिकेमधील एका अभिनेत्रीला नवीन प्रोजेक्ट मिळाला असल्याने लवकरच ती अभिनेत्री मोठ्या पडद्यावर झळकताना सर्वांना पहायला मिळणार आहे.

झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ ही सीरिअल अगदी कमी काळात प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाली आहे. या मालिकेत काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करताना दिसतात. या मालिकेत प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे आणि गुणी अभिनेत्री प्रार्थना बेहरे हे दोघे मुख्य भूमिका साकार करत आहेत. विशेष म्हणजे या दोघांची केमेस्ट्री प्रेक्षकांच्या देखील खुपच पसंतीस पडत आहे. शिवाय यातील छोटी परी म्हणजे मायरा वायकुळ ही देखील आपल्या निरागस अंदाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसते! आता याच मालिकेमधील एका अभिनेत्रीला नवीन प्रोजेक्ट मिळाला असून लवकरच ही अभिनेत्री मोठ्या पडद्यावर झळकताना दिसणार आहे. तिला एका नवीन सिनेमा मध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे! आणि ही अभिनेत्री म्हणजे दुसरी कोणी नसून स्वाती पानसारे ही आहे.

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या सीरिअल मध्ये अभिनेत्री स्वाती पानसारे यशच्या काकूची भूमिका निभावताना दिसते. या मालिकेत तिचं नाव मिथिला अस आहे. नवऱ्याच्या प्रेमाला तरसणारी, साधी सरळ आणि तितकीच प्रेमळ मिथिला अल्पावधीतच सर्वांची लाडकी झाली आहे, आणि आता तिला मोठ्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली आहे. ‘आय एम सॉरी’ (I Am Sorry ) नावाच्या या मराठी सिनेमात स्वाती पानसारे महत्त्वपूर्ण भूमिका निभावताना दिसणार आहे. येत्या १३ मे रोजी ‘आय एम सॉरी’ हा नवीन मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Swati Pansare (@swatipansareofficial)

‘आय एम सॉरी’ या चित्रपटात मराठी चित्रपटां सोबतच सन टीव्हीवरील जाऊ नको दूर बाबा तसेच ‘तेरी लाडली मैं’ या हिंदी मालिकेतुन झळकलेली मयूरी कापडणे यात मुख्य भूमिका साकारताना दिसणार असून तिच्या जोडीला रियाज मुलाणी आहे. याशिवाय राजेश लाटकर, भगरे गुरुजी, अस्मिता खटखटे, स्वाती पानसरे, अनुराग शर्मा, नेहा तिवारी, राजन ताम्हाणे, समीरा गुजर, कौस्तुभ पाध्ये, श्रीकांत कामत, सुषमा सीनलकर, बाल कलाकार, ओमकार जाधव, सानवी चव्हाण या इतर कलाकारांच्याही महत्वपूर्ण भूमिका यात आहेत.

एम. जे. फिल्म्सची प्रस्तुती असलेल्या ‘आय एम सॅारी’ या सिनेमाची निर्मिती अब्दुल मजीद चिकटे यांनी केली आहे. बांधकाम व्यावसायिक आणि समाजसेवक असलेल्या अब्दुल मजीद चिकटे यांचा हा पहिलाच मराठी सिनेमा असून कार्यकारी निर्माता रविंद्र जाधव यांनी देखील या चित्रपटासाठी अविरत परिश्रम घेतले आहेत. समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी यांच्या पिकल एन्टरटेन्मेंटच्या सहयोगानं हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित करण्यात येणार आहे. या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन दीपक भागवत यांनी केलेलं आहे.

स्वातीच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल सांगायचे झाले तर तिने ‘आप्पा आणि बाप्पा’, ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ या सिनेमांमधून काम केलेलं आहे. या खेरीज हिंदी मालिका व जाहिराततीं मधून देखील ती झळकली आहे. आणि आता तिचे चाहते तिला या नवीन भूमिकेमध्ये पाहण्यासाठी खुपच उत्सुक आहेत.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप