IPL च्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वाधिक धावांची पार्टनरशिप, टाका त्यावर एक नजर..!

इंडियन प्रीमियर लीग (IPL) ही एक अशी स्पर्धा आहे जिथे प्रत्येक संघाला त्यांच्या फलंदाजांकडून वेगवान आणि मोठ्या भागीदारीची अपेक्षा असते. कोणत्याही संघाला सामना जिंकण्यासाठी चांगली भागीदारी महत्त्वाची भूमिका बजावते. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत असे अनेक सामने झाले आहेत ज्यात खालच्या फळीतील फलंदाजांनीही संघाला विजयापर्यंत नेण्यासाठी मोठी भागीदारी केली आहे. आयपीएल मध्ये आतापर्यंतच्या झालेल्या सर्वाधिक धावांच्या भागीदारींवर एक नजर टाकूया.

View this post on Instagram

A post shared by IPL (@iplt20)

आयपीएलच्या इतिहासात सलामीच्या भागीदारीचा विक्रम २०२२ च्या हंगामात लखनौ सुपर जायंट्सने केला होता. ज्यामध्ये क्विंटन डी कॉक आणि केएल राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी नाबाद २१० धावांची भागीदारी केली होती, ज्यात त्यांनी कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात ही कामगिरी केली होती.

दुसऱ्या विकेटबद्दल बोलायचे झाले तर, विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सने IPL २०१६ मध्ये २२९ धावा जोडून छोट्या फॉरमॅटमध्ये सर्वोच्च भागीदारी केली होती. या सामन्यात दोन्ही खेळाडूंनी शानदार शतके झळकावली होती आणि अखेरीस आरसीबीने १४४ धावांनी विजय मिळवला होता.

View this post on Instagram

A post shared by IPL (@iplt20)

सर्वोच्च भागीदारीच्या रेकॉर्डमध्ये तिसरे स्थान कॅमेरून व्हाईट आणि कुमार संगकारा यांच्या नावावर आहे. दोन्ही फलंदाजांनी डेक्कन चार्जर्ससाठी तिसऱ्या विकेटसाठी १५७ धावांची भागीदारी केली होती आणि संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. डेक्कन चार्जर्सने हा सामना पुणे वॉरियर्सवर १३ धावांनी जिंकला होता. शिमरॉन हेटमायर आणि गुरकीरत सिंग यांनी आयपीएल २०१९ मध्ये चौथ्या विकेटसाठी १४४ धावांची भागीदारी केली होती. हेटमायरने ४७ चेंडूत ४ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ७५ धावा केल्या होत्या आणि संघाला १७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यात मदत केली होती.

शकीब अल हसन आणि युसूफ पठाण यांनी पाचव्या विकेट साठी यशस्वी भागीदारी करत संघाला संकटातून बाहेर काढले होते. दोन्ही खेळाडूंनी संघासाठी १३४ धावांची भागीदारी केली होती आणि संघाची धावसंख्या १५८/४ पर्यंत नेली होती. मात्र ही धावसंख्या पुरेशी ठरली नाही. २०१२ मध्ये मुंबई इंडियन्ससाठी अंबाती रायडू आणि किरॉन पोलार्ड यांच्यात सहाव्या विकेटसाठी मोठी भागीदारी झाली होती. दोन्ही खेळाडूंनी कठीण काळात संघासाठी १२२ धावांची भागीदारी केली होती. सातव्या विकेटसाठी सर्वात मोठ्या भागीदारीचा विक्रम जगदीश सुचित आणि हरभजन सिंग यांच्या नावावर आहे. या दोन्ही खेळाडूंनी २०१९ मध्ये पंजाब विरुद्ध त्यांच्या संघासाठी १०० धावांची भागीदारी केली होती. हरभजनने १९ चेंडूत शानदार अर्धशतक झळकावले होते.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप