१२५ वर्षे असणाऱ्या स्वामी शिवानंद आयुष्याचे प्राकृतिक रहस्य, तुम्हाला सुद्धा एवढे आयुष्य हवे असेल तर शारीरिक Sex life पासून..

आजकाल माणसांना वयाची शंभरी पार करणे देखील अवघड झाले आहे, ६०-७०व्या वर्षीच माणसे जगाचा निरोप घेताना दिसतात. परंतु स्वामी शिवानंद यांचे आजच्या घडीचे वय ऐकलात तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, आजला त्यांनी वयाची १२५ वर्षे ठणठणीत राहून आता १२६ व्या वर्षात यशस्वी पदार्पण करणार आहे! म्हणूनच त्यांच्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड कुतुहूल निर्माण झाले आहे. दिल्लीतील राष्ट्रपती भवनात सोमवारी पद्म पुरस्काराच्या मानकऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी वाराणसीच्या १२६ वर्षाच्या स्वामी शिवानंद यांनी सर्वाचं लक्ष वेधून घेतलं. यावेळी त्यांना योगा क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल पद्म पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.

स्वामी शिवानंद पुरस्कार घेण्यासाठी स्टेजवर पोहोचले असता आपल्या साधेपणाने त्यांनी सर्वांचं मन जिंकुन घेतलं. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच राष्ट्रपतींसमोर नतमस्तक होत सर्वांना आपल्या व्यक्तीमत्वाने भारावून टाकलं. स्वामी शिवानंद यांचा जन्म ८ ऑगस्ट १८९६ रोजी बंगालच्या श्रीहट्टी नावाच्या जिल्ह्यात झाला. त्यांच्या आई-वडिलांचे उपासमारीने नि’धन झाले होते, तेव्हापासून शिवानंद यांनी अर्ध्या पोटी जेवण्याचे व्रत घेतले, ते आजतागायत कसोशीने पाळत आहेत.

काही काळानंतर त्यांनी बंगालमधून काशी गाठली आणि येथे गुरु ओंकारानंद यांच्याकडून प्रशिक्षण घेतले. १९२५ मध्ये, ओंकारानंद यांच्या आदेशानुसार, त्यांनी जगभराचा दौरा पार पाडला, त्यांनी आतापर्यंत सुमारे ३४ वर्षे देश-विदेशात प्रवास केला आहे. आश्रमातुन दीक्षा घेतल्यानंतर १९७७ साली ते वृंदावनला गेले. दोन वर्षे वृंदावन मध्ये निवास केल्यानंतर ते १९७९ मध्ये वाराणसीला आले. तेव्हापासून ते तेथेच राहत आहेत.

स्वामी शिवानंद आत्तापर्यंत अनेक देश फिरले आहेत. विमानतळावरही त्यांना एवढ्या वयात कोणाचाही आधार न घेता फिरताना पाहून लोक आश्चर्याने थक्क होतात. वाराणसीमध्ये काही वर्षे राहिल्यानंतर त्यांनी लोकांना योग आणि निरोगी दिनचर्या अंगिकरण्यासाठी प्रेरित करण्यास सुरुवात केली. काशीबद्दल सांगताना ते म्हणतात की ती एक पवित्र अशी तपोभूमी आहे. येथे भगवान शंकर स्वतः निवास करतात, त्यामुळे त्यांना येथे त्यांच्या सानिध्यात राहण्यास फार आवडते. स्वामी शिवानंद यांना योग आणि धर्माचे खूप सखोल ज्ञान प्राप्त झाले आहे.

दरम्यान वयाची १२६ वर्षे पूर्ण करणाऱ्या स्वामी शिवानंद यांच्याबद्दल जनतेमध्ये प्रचंड कुतुहूल आहे. इतकी वर्ष ते निरोगी आयुष्य कसे काय जगत आले आहेत याबद्दल लोकांमध्ये उत्सुकता असून ते कायम हे जाणून घेण्याच्या प्रयत्नात असतात. आपल्या एका जुन्या मुलाखतीत त्यांनी याबद्दल खुलासा केला होता. स्वामी शिवानंद यांनी आपण रोज योगा करतो तसंच से’क्स अंतर ठेवणं आपल्या इतक्या मोठ्या आयुष्याचं गुपित असल्याचं म्हटलं आहे.

स्वामी शिवानंद यांनी अस सांगितलं होतं की, आपण सेक्स करण्यापासून दूर राहतो तसंच मसाल्यांचं सेवन करत नाही. याशिवाय रोज योगा करणं आपल्या हा आयुष्याचा महत्वाचा भाग आहे. शिवानंद यांच्या पासपोर्टनुसार, त्यांचा जन्म ८ ऑगस्ट १८९६ मध्ये झाला आहे. १९ वं शतक सुरु होण्याआधी जन्म झालेल्या स्वामी शिवानंद यांना २१ व्या शतकात २०२२ मध्ये हा सन्मान प्राप्त झाला आहे.

कोलकातामध्ये एएफपीशी बोलताना स्वामी शिवानंद यांनी तेथे सांगितलं होतं की, मी अत्यंत साधं आणि शिस्तबद्ध जीवन जगण्यास प्राधान्य देतो. मी जेवणही अगदी साधंच करतो ज्यामध्ये फक्त उकडलेल्या अन्नाचा समावेश असतो. यामध्ये कोणत्याही प्रकारचं तेल किंवा मसाला नसतो. डाळ, भात आणि हिरवी मिरची हेच मी खासकरुन खातो”. ५ फूट २ इंच उंची असणारे स्वामी शिवानंद एका साध्याश्या चटईवर झोपतात. इतकंच नाही तर आपण दूध आणि फळे देखील खात नाही, कारण ते फॅन्सी फूड आहे असं त्यांचं म्हणणं आहे.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप