वाचक मित्रांनो , यावेळी जर प्रेक्षक सर्वात जास्त कशाची वाट पाहत असतील तर ती म्हणजे आयपीएल लीग आणि आता आयपीएलचा पुढचा सीझन २६ मार्चपासून सुरू होणार आहे आणि ही आयपीएल लीग २९ मे पर्यंत चालणार आहे. यावेळी बातमी अशीही आहे की आयपीएलचा हा सीझन मुंबई आणि पुण्याच्या ४ मैदानांवर खेळवला जाणार आहे
पण मित्रांनो आयपीएल चाहत्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे प्रेक्षकांना आयपीएल मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जाण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले जाणार आहे. याशिवाय, संपूर्ण देशवासियांना या सामन्याचे थेट प्रक्षेपण देखील पाहता येणार आहे, परंतु हे प्रक्षेपण आम्हाला कोठे पाहायला मिळेल हे अद्याप उघड झालेले नाही.
आताच्या ब्रॉडकास्टर डिज्नी स्टार सोबतचा सध्याचा करार संपुष्टात येत आहे. बातम्यांनुसार, लवकरच बीसीसीआय २०२३ ते २०२७ या वर्षासाठीच्या आयपीएल प्रसारणासाठी मीडिया अधिकारांची निविदा काढणार आहे. मात्र, गेल्या १० वर्षांपासून आयपीएलचे प्रसारण करणारी ही लीग, सोनी पिक्चर्स पुन्हा एकदा यामध्ये बोली लावू शकते. स्टार इंडियाने चालू २०१८-२२ साठी IPL चे मीडिया ब्रॉडकास्ट राइट्स १६,३४७ कोटी रुपयांना विकत घेतले होते.
पण , Sony Pictures Networks India ने ८२०० कोटी रुपये देऊन १० वर्षे सीझन १ ते १० चे मीडिया ब्रॉडकास्ट अधिकार घेतले होते, ते अधिकार परत मिळवण्यास Sony Pictures उत्सुक आहे. पण त्यांना आयपीएलचे ब्रॉडकास्ट हक्क सहज मिळणे अवघड आहे. कारण अन्य कंपनी सुद्धा ही ब्रॉडकास्ट खरेदी करण्यासाठी उत्सुक आहेत.
डिज्नी व्यतिरिक्त, रिलायन्स वायकॉम १८ आणि अॅमेझॉन सारखे अनेक मोठे उद्योग समूह याची वाट पाहत आहेत. आता मीडियाचे राइट्स कोणाकडे जाणार? हेही बघायला आपल्याला काहीच दिवसात मिळू शकेल आणि आपल्याला ते पाहण्यात खूप मजा येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २०२३ ते २०२७ या कालावधीत IPL प्रसारणासाठी सुमारे ५० हजार कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे आणि असे बोलले जात आहे की मीडियाचे राइट्स अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजकडे जाऊ शकतात. मित्रांनो, आता चाहत्यांसाठी आयपीएलशी संबंधित बातम्या रोज येत राहतील आणि आयपीएलचे थेट प्रक्षेपण कुठे होणार. हे देखील आपल्याला लवकरच पाहायला मिळेल.