विराट कोहलीने आरसीबीचे कर्णधारपद सोडण्यामागचे खरे कारण आले समोर, माजी कर्णधाराने धक्कादायक केला खुलासा..!

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आपल्या कुटुंबासोबत क्वालिटी टाइम घालवत आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या शेवटच्या टी-२० सामन्या पूर्वी त्याला विश्रांती देण्यात आली होती आणि विराट श्रीलंके विरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतही दिसणार नाही. विराट थेट श्रीलंके विरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळणार असून, मोहाली मध्ये हा त्याच्या कारकिर्दीतील १०० वा सामना असेल. त्याचवेळी, आयपीएलच्या १५ व्या हंगामा पूर्वी विराट कोहलीने आरसीबीचे कर्णधारपद का सोडले याचा खुलासा केला आहे.

आयपीएलचा १५ वा सीझन मार्चच्या अखेरीस सुरू होणार आहे. यावेळी प्रथमच दोन नवीन संघ या लीगचा भाग बनत आहेत. त्याचबरोबर अनेक फ्रँचायझींचा संघ नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. मात्र, आतापर्यंत पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांनी त्यांच्या नवीन कर्णधाराच्या नावाची घोषणा केलेली नाही. गेल्या मोसमातच महान फलंदाज विराट कोहलीने इंडियन प्रीमियर लीग (IPL) संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चे कर्णधारपद सोडले होते. गेल्या मोसमाच्या दुसऱ्या टप्प्याच्या आधी त्याने ही माहिती दिली होती.

कोहलीने आरसीबीचे कर्णधारपद का सोडले याची माहिती दिली आहे.विराट म्हणतो की, त्याला खरं तर स्वत:साठी वेळ द्यायचा होता. आरसीबीचे कर्णधारपद सोडण्याबाबत विराट कोहली ‘द आरसीबी पॉडकास्ट’ मध्ये म्हणाला, मी त्या लोकांमध्ये नाही, ज्यांना गोष्टी धरून ठेवायची असतात. मी खूप काही करू शकतो. पण जर मला या प्रक्रियेचा आनंद घेता येत नसेल तर मी ते काम करणार नाही. कोहली म्हणाला की, जेव्हा एखादा खेळाडू असा निर्णय घेतो तेव्हा त्याच्या मनात काय होते हे समजणे लोकांना कठीण जाते.


श्रीलंके विरुद्धच्या T-२० मालिके नंतर विराट कोहली मोहाली क्रिकेट मैदानावर त्याच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीतील १०० वा सामना खेळणार आहे. १०० वी कसोटी खेळण्याच्या तयारीत असलेला विराट कोहली पुढे म्हणाला, जोपर्यंत लोक तुमच्या पदावर नसतील, त्यांना तुमचा निर्णय समजणे फार कठीण आहे. लोकांच्या स्वतःच्या अपेक्षा आहेत. तुमच्या निर्णयाबाबत ते म्हणतात की अरे हे कसे झाले, याचे आम्हाला आश्चर्य वाटते, यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही असे तो म्हणाला. मी लोकांना समजावून सांगतो की मला माझ्यासाठीही वेळ हवा होता.

आयपीएलच्या सुरुवातीच्या मोसमा पासून आता पर्यंत विजेतेपद आरसीबीच्या नशिबी आलेले नाही. अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास करून संघ विजेतेपदा पासून वंचित राहिला आहे. अनुभवी फिरकीपटू अनिल कुंबळेच्या नेतृत्वाखाली प्रथमच, विराट कोहलीनेही संघाला अंतिम फेरीत नेले पण ट्रॉफीवर क’ब्जा करता आला नाही.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप