टी-२० विश्वचषक २०२२ साठी भारताने तयार केली तगडी टीम, अशी असेल संभाव्य टीम..!!

यंदा IPL सारखी या वर्षी टी-२० विश्वचषकही जोरदार खेळवला जाणार आहे. या विश्वचषकच्या पार्श्वभूमीवर भारताने खूप जोरदार तयारी सुरु केली आहे.त्यामधील च एक भाग म्हणजेच टीम निवडणे यंदा IPL मध्ये अनेक नवीन चहरे पाहायला मिळाले. सर्वच खेळाडूंनी चांगली कामगिरी केल्या मुळे संघ निवडणे सुद्धा तितकेच कठीण झाले आहे, चला तर मग जाणून घेऊ कशी असेल भारताची संभाव्य टीम.

KL ची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यावरून व्यवस्थापनाचा त्याच्यावर प्रचंड विश्वास असल्याचे दिसून येते. केएलने आयपीएलमध्येही चांगली कामगिरी केली आहे.तो नेहमी धावा करत असतो फक्त त्याला त्याचा स्ट्राइक रेट थोडा सुधारण्याची गरज आहे.असे प्रशिक्षकांचे मत आहे. विश्वचषकापर्यंत तो याकडे लक्ष देईल, अशी आशा आहे. तसेच रोहित शर्मा संघाचा कर्णधार असून तो त्याचा जोडीदार असेल. सलामीवीर म्हणून इशान किशनचीही संघात निवड होऊ शकते. इशान डावखुरा असल्याने त्याच्यासाठी उपयुक्त ठरेल.

मधल्या फळीत थोडाफार फॉर्मात आलेल्या विराट कोहलीला संजू सॅमसनसह मधल्या फळीत जागा मिळण्याची खात्री आहे, आयपीएलमधील उत्कृष्ट कामगिरीमुळे राहुल त्रिपाठीला संघात स्थान मिळू शकते. राहुल आणि संजू या दोघांनी आयपीएलमध्ये ४०० हून अधिक धावा केल्या आहेत. संजू आणि राहुलचा स्ट्राईक रेटही उत्कृष्ट राहिला आहे. यासोबतच ऋषभ पंतलाही या मधल्या फळीत स्थान मिळण्याची खात्री आहे.

गुजरात टायटन्सच्या कर्णधाराने आयपीएलमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. पण त्याच्या फिनिशिंग क्षमतेबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे, अशा परिस्थितीत हार्दिकचा फिनिशर म्हणून वापर केला जाऊ शकतो, एवढेच नाही तर हार्दिकची गोलंदाजीही चांगली आहे. दिनेश कार्तिकने आयपीएलमधील कामगिरीनंतर तीन वर्षांनंतर भारतीय संघात स्थान मिळवले आहे, त्यामुळे त्याची कामगिरी अशीच सुरू राहिल्यास त्याला विश्वचषक संघातही स्थान मिळू शकते.

या आयपीएलमध्ये रवींद्र जडेजा खूपच कमकुवत दिसत होता आणि त्याला दुखापतही झाली होती, तर दुसरीकडे आर अश्विनने बॉल आणि बॅट दोन्हीमध्ये चमकदार कामगिरी केली, त्याच्या अनुभवामुळे त्याला अष्टपैलू म्हणून संघात ठेवता येईल. दुसरीकडे भुवनेश्वर कुमारही थोडीफार फलंदाजी करू शकतो.भुवनेश्वरऐवजी दीपक चहरलाही पसंती दिली जाऊ शकते, मात्र तो बऱ्याच दिवसांपासून दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या फिटनेसबाबत शंका आहेत.

फिरकी गोलंदाजीत अश्विनसोबत युझवेंद्र चहल संघासाठी उपयुक्त ठरू शकतो. चहल हा अतिशय हुशार गोलंदाज आहे आणि त्याने हे वारंवार सिद्ध केले आहे. तोही या संघात असणार हे नक्की.
केएल राहुल, रोहित शर्मा, इशान किशन, विराट कोहली, संजू सॅमसन, ऋषभ पंत, राहुल त्रिपाठी, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, उमरान मलिक, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप