वेस्ट इंडिज पुढील महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या मालिकेपूर्वी, भारतीय संघाचा पांढऱ्या चेंडूचा कर्णधार रोहित शर्मा पुनरागमन करण्यासाठी सज्ज असून तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे. उजव्या हाताचा फलंदाज रोहित दुखापतीमुळे नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला मुकला होता.
आता हा अनुभवी फलंदाज पूर्णपणे तंदुरुस्त असून वेस्ट इंडिजविरुद्ध टीम इंडियाचे नेतृत्व करण्यास सज्ज आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी निवडकर्ते लवकरच एकदिवसीय आणि टी-२० संघांची घोषणा करतील. आता या आगामी मालिकेत भुवनेश्वर कुमारला स्थान मिळते का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल, ज्याची दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कामगिरी खराब होती. तसेच, रविचंद्रन अश्विनचीही निवड होते की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरेल कारण वनडेतही त्याचा खेळ सामान्य होता.
रोहित शर्मा तंदुरुस्त आहे आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी उपलब्ध आहे. वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका सुरू होईपर्यंत रोहितच्या रिहैबिलिटेशन साडेसात आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी लागणार आहे. त्याने आधीच मुंबईत प्रशिक्षण सुरू केले आहे आणि फिटनेस चाचणीसाठी त्याला बंगळुरूला जाण्याची आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडून औपचारिक मान्यता मिळण्याची अपेक्षा आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर विराट कोहलीला कसोटी कर्णधारपदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्याच्या जागी रोहित शर्माचे कर्णधार होणे जवळपास निश्चित झाले आहे. २०२२ आणि २०२३ मध्ये लागोपाठ दोन विश्वचषकांमध्ये संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी आणि कामाचा ताण यामुळे बीसीसीआय इतर पर्यायांचाही विचार करत आहे. त्याच वेळी, सर्वांच्या नजरा केएल राहुलवर आहेत, जो आयपीएलमध्ये लखनऊचे नेतृत्व करेल. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर त्याच्या नेतृत्वाखाली संघाने ४ सामने गमावले आहेत. अशा स्थितीत आगामी काळात त्याला पुन्हा कर्णधारपद मिळेल का यावर आताच काही सांगणे कठीण आहे.
हार्दिक पांड्या पुनरागमन करणार का हा सर्वात मोठा प्रश्न सध्या चर्चेत आहे. अहमदाबाद फ्रँचायझीने नुकतीच हार्दिकची आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून घोषणा केली आहे. दक्षिण आफ्रिकेत त्याच्या जागी व्यंकटेश अय्यर खेळला होता पण दोन सामन्यांत तो फारसा प्रभावी दिसला नाही. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात हार्दिक पांड्याची कमी जाणवल्याची कबुली खुद्द मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने दिली आहे. पण पंड्या आता तंदुरुस्त असून आगामी मालिकेसाठी तो उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. आता पाहूया रोहितच्या येण्याने भारतीय संघाची कामगिरी कशी होते.