असे वक्त्यव्य केल्यामुळे RCB च्या नव्या कर्णधाराच्या मुलाखतीचा व्हिडिओ झाला व्हायरल, म्हणाला मी..

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर नवा कर्णधार फाफ डू प्लेसिसची मुलाखत शेअर केली आहे. ही मुलाखत पूर्णपणे मजेशीर पद्धतीने घेण्यात आली असून लोकांना ती खूप आवडली आहे. सुमारे सात मिनिटांच्या व्हिडिओ मुलाखतीत, डू प्लेसिस आरसीबीचा मजेदार माणूस मिस्टर नॅग्स यांच्याशी गप्पा मारताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये, CSK  खेळाडु डु प्लेसिस आरसीबीकडून खेळण्याचा निर्णय घेण्यापासून अनेक मुद्द्यांवर बोलला आहे. देशबांधव एबी डिव्हिलियर्स, डेल स्टेन आणि ख्रिस मॉरिस यांच्यानंतर आरसीबीकडून खेळताना डु प्लेसिस म्हणाला, मला हा संघ  आवडला संघातली सगळे खेळाडू खूप कमी वेळात एकत्र येऊन एकमेकांचे चांगले मित्र बनले आहेत.

त्यानंतर त्याने सर्व करतानाच्या काही आठवणींना उजाळा देत म्हणाला मी साधे पॅड घालत  नाही.  मला इतरांपेक्षा वेगळे ठेवणारी एकमेव गोष्ट म्हणजे मी तीन बॉक्सर पॅड घालतो, सुरवातीला मला सर्व जण हसू लागले परंतु ही  माझी सवय आहे असं म्हणत त्याने मजेदार किस्सा सांगतला.

RCB ने IPL २०२२ च्या लिलावात फाफ डु प्लेसिसला ७ कोटी रुपयांना विकत घेतले. यानंतर फ्रँचायझीने त्यांची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. विराट कोहलीने गेल्या मोसमाचा दुसरा टप्पा सुरू होण्यापूर्वीच स्पष्ट केले होते की, तो यापुढे आरसीबीचा कर्णधार राहणार नाही. डू प्लेसिसला आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्णधारपदाचा चांगला अनुभव आहे.

फाफ डु प्लेसिसला आरसीबीचा नवा कर्णधार बनवल्यानंतर एबी डिव्हिलियर्सने मोठी प्रतिक्रिया दिली संधी मिळाल्यास मी आरसीबीचा कर्णधार होऊ शकतो, या नव्या दिग्गजाचे विधान १०० आयपीएल सामन्यांमध्ये जवळपास तीन हजार धावा करणाऱ्या डु प्लेसिसने सातत्याने धावा केल्या आहेत. गेल्या मोसमापर्यंत तो चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत होता आणि प्लेइंग इलेव्हनचा महत्त्वाचा भाग होता.

प्लेसिस हा दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू आहे. त्यांचा जन्म १३ जुलै १९८४ रोजी प्रिटोरिया, ट्रान्सवाल प्रांत, दक्षिण आफ्रिकेत झाला. फाफ डू प्लेसिस हा दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचा खेळाच्या सर्व फॉरमॅटमध्ये सध्याचा कर्णधार आहे. तो एक अतिशय लोकप्रिय फलंदाज आहे जो उजव्या हाताचा फलंदाज आणि उजव्या हाताने लेग ब्रेक गोलंदाज म्हणून खेळला. १८ जानेवारी २०११ रोजी फाफ डू प्लेसिसला भारताविरुद्धचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण वनडे सामना करण्यात आला. त्याने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक क्रिकेट सामने खेळले आहेत. २०१८ च्या आयपीएल लिलावात फाफ डु प्लेसिसला चेन्नई सुपर किंग्ज संघाने विकत घेतले होते. तो खूप प्रतिभावान आणि दक्षिण आफ्रिकेतील सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटू आहे.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप