आयपीएल २०२२ च्या दुसऱ्या सामन्यापूर्वीच मुंबई इंडियन्ससाठी एक आनंदाची बातमी आली आहे. दुखापतीमुळे बाहेर झालेला संघाचा एक स्टार खेळाडू आता फिट होऊन संघात पुनरागमन करत आहे. पहिला सामना गमावल्या नंतर मुंबई इंडियन्सच्या या खेळाडूच्या पुनरागमना मुळे संघाला मोठा दिलासा मिळणार आहे. आयपीएलच्या या मोसमात आता या खेळाडूच्या जोरावर मुंबई इंडियन्स उर्वरित मॅचेस वरती वर्चस्व गाजवणार आहे. किंबहुना अशा खेळाडूचे संघात पुनरागमन होत आहे, जो एकटाच सामन्या बदलण्यात ताकत मानला जातो.
हा तगडा खेळाडू मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला आहे : आयपीएल २०२२ ची सुरुवात मुंबई इंडियन्ससाठी काही खास नाहीए . पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर संघाची निराशा झाली होती. पण मुंबई इंडियन्सच्या दुसऱ्या सामन्यापूर्वी टीमसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. वास्तविक, दुखापतीमुळे बाहेर असलेल्या सूर्यकुमार यादवचा मुंबई इंडियन्समध्ये प्रवेश झाला आहे. भारत-वेस्ट इंडिज मालिकेदरम्यानच सूर्यकुमारला दुखापत झाली होती.
Training day #1 of the new season for SKY ☀️#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians @surya_14kumar pic.twitter.com/6Ax6s7u1bH
— Mumbai Indians (@mipaltan) March 31, 2022
त्यानंतर त्याला मालिकेतूनही बाहेर पडावे लागले आणि त्याला आयपीएलच्या पहिल्या सामन्यातून बाहेर बसावे लागले. पण आता तो त्याच्या बोटाच्या दुखापतीतून बाहेर आला आहे आणि राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वीच त्याचा संघ मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला आहे. सुर्यकुमार यादव यांनी क्वारंटाईन पूर्ण केल्यानंतरच संघात सामील झाला आहे , संघात सामील झाल्याने अनेक खूप खुश दिसत आहेत.
सूर्यकुमार यादवची आयपीएल कामगिरी: सूर्यकुमार यादवने आतापर्यंत आयपीएलमधील ११४ सामन्यांत २३४१ धावा केल्या आहेत, ज्यात १३ अर्धशतकांचा समावेश आहे. मुंबई इंडियन्सपूर्वी, सूर्यकुमार देखील कोलकाता नाईट रायडर्सचा भाग होता, परंतु मुंबई इंडियन्समध्ये सामील झाल्यापासून त्याच्या कामगिरीत वेगळीच झेप घेतली आहे. मुंबई इंडियन्ससाठी तो आता महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे ज्यांच्याकडे कधीही सामना फिरवण्याची ताकद आहे.