‘संपूर्ण देश ११ खेळाडूंविरुद्ध खेळत आहे’, DRS च्या नाटकानंतर केएल राहुल संतापला..!

केपटाऊनमधील तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावातील २१ व्या षटकातील चौथ्या चेंडूनंतर मैदानावर हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. रविचंद्रन अश्विनने चांगला लेन्थ बॉल टाकला, ज्यावर डीन एल्गर चुकला. चेंडू थेट एल्गरच्या पॅडवर लागला, ज्यावर टीम इंडियाच्या खेळाडूंच्या अपील नंतर पंच मारायस इरास्मस याने त्याला बाद घोषित केले.

त्यानंतर एल्गारने डीआरएसचा वापर केला. रिव्ह्यूमध्ये असे आले की चेंडू विकेटच्या ओळीत गेला आणि विकेटच्या ओळीतच पॅडला लागला. पण बॉल ट्रॅकिंगनुसार चेंडू लेग स्टंपला चुकवणार होता. त्यानंतर तिसऱ्या पंचाने एल्गरला नाबाद घोषित केले. हे पाहून कॅप्टन विराट कोहलीसह टीम इंडियाचे सर्व खेळाडू अवाक झाले. हा रिव्ह्यू पाहून कोहली, रविचंद्रन अश्विन आणि केएल राहुल यांनी नाराजी व्यक्त केली.

स्टंप माईकमध्ये राहुलचा आवाज कैद झाला होता, ज्यामध्ये तो म्हणत होता – संपूर्ण देश ११ खेळाडूंविरुद्ध खेळत आहे. या निर्णयाने पंच इरास्मसलाही आश्चर्य वाटले आणि हे अशक्य आहे असे म्हणाला.

एल्गरने एलबीडब्ल्यूचा निर्णय उलटल्यानंतर स्टंप माईकमध्ये हा आवाज रेकॉर्ड झाला.

इरास्मस – हे अशक्य आहे.

अश्विन – सुपरस्पोर्ट, जिंकण्यासाठी तुम्हाला आणखी चांगले मार्ग शोधावे लागतील.

कोहली- तुमच्या संघाकडेही लक्ष द्या जेव्हा ते चेंडू चमकवतात, फक्त विरोधी संघातील खेळाडूंकडेच नाही.

केएल राहुल- संपूर्ण देश ११ खेळाडूंविरुद्ध खेळत आहे.

भारत विरुद्ध केपटाऊन येथे खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात २ गडी गमावून १०१ धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिका संघ विजयापासून अद्याप १११ धावा दूर आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा कीगन पीटरसन नाबाद ४८ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. एल्गरने ९६ चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने ३० धावा केल्या आहेत. ऋषभ पंतने नाबाद शतक झळकावले आणि भारताने दुसऱ्या डावात १९८ धावा केल्या. पहिल्या डावात १३ धावांच्या आघाडीमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर २१२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

भारतीय विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने १० महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊन कसोटीत त्याने कारकिर्दीतील चौथे शतक झळकावले आहे. शेवटचे शतक पंतने मार्च २०२१ मध्ये इंग्लंडविरुद्ध केले होते. याशिवाय त्याने २०१९ मध्ये सिडनीच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावले होते. त्याचवेळी पंतने २०१८ मध्ये केनिंग्टन ओव्हल येथे इंग्लंडविरुद्ध पहिले शतक झळकावले होते. तसेच पंत दक्षिण आफ्रिकेत शतक झळकावणारा पहिला आशियाई यष्टिरक्षक ठरला आहे. महेंद्रसिंग धोनी आणि कुमार संगकारा यांनाही आफ्रिकेच्या मैदानावर शतक झळकावता आले नाही. दक्षिण आफ्रिकेत धोनीची सर्वोच्च धावसंख्या ९० आणि संगकाराची ८९ होती.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप