बंगळुरूमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या डे-नाईट कसोटीत टीम इंडियाने नेहमीप्रमाणेच दमदार कामगिरी केली. भारताने खेळलेल्या पहिल्या डावात श्रीलंकेला केवळ १०९ धावांत गुंडाळले. ज्या खेळपट्टीवर श्रीलंकेच्या फिरकीपटूंची जादू चालली होती, त्याच खेळपट्टीवर भारताच्या जसप्रीत बुम बुम बुमराहने कहर केला आहे. जसप्रीत बुमराहने एकूण ५ गडी बाद केले आहेत. कसोटी कारकिर्दीत त्याने कसोटी डावांत पाच किंवा त्याहून अधिक बळी घेण्याची ही आठवी वेळ ठरली! पण यातली विशेष बाब म्हणजे जसप्रीत बुमराहने भारतात खेळताना पहिल्यांदाच एका डावात पाच बळी टिपले. त्यामुळे त्याची बायको संजना गणेशन हिने त्याचं अभिमानाने मनसोक्त कौतुक केलं आहे.
8th and counting! So proud ❤️👑
— Sanjana Ganesan (@SanjanaGanesan) March 13, 2022
1. 27-6 वि वेस्ट इंडीज (किंग्स्टन)
2. 33-6 वि ऑस्ट्रेलिया (मेलबर्न)
3. 7-5 वि वेस्ट इंडीज (नॉर्थ साऊंड)
4. 24-5 वि श्रीलंका (बेंगळुरू)
5. 42-5 वि दक्षिण आफ्रिका (केपटाऊन)
6. 54-5 वि दक्षिण आफ्रिका (जोहान्सबर्ग)
7. 64-5 विरुद्ध इंग्लंड (नॉटिंगहॅम)
8. 85-5 विरुद्ध इंग्लंड (नॉटिंगहॅम)
श्रीलंकेविरुद्धच्या बंगळुरू कसोटीच्या पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने १० षटकात २४ धावा दिल्या आणि याचबरोबर पाच विकेट्स घेतल्या. या दरम्यान जसप्रीत बुमराहने आपल्या स्पेलमध्ये ४ मेडन ओव्हर्सही टाकली. त्याशिवाय भारताकडून मोहम्मद शमी आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी दोन तर अक्षर पटेलने एक बळी मिळवला. बुमराहच्या या नव्या कामगिरीवर त्याची पत्नी संजना अतिशय खुश झाली आहे . तिने अतिशय गोड शब्दात अभिमानाने आपल्या पतीचं कौतुक सोशीलमीडियाच्या माध्यमातून शेयर केलं आहे.
View this post on Instagram
जसप्रीत बुमराहने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील आठव्यांदा पाच विकेट घेतल्यावर त्याची पत्नी संजना गणेशनने ट्विटरवर सुंदर प्रतिक्रिया देत एक पोस्ट शेयर केली आहे. त्यात संजनाने लिहिले की आठव्यांदा डावात पाच विकेट्स आणि मोजणी अजूनही सुरूच आहे… खूप अभिमान वाटतो.!
संजना गणेशन सध्या न्यूझीलंडमध्ये वास्तव्यास असून ती महिला विश्वचषकात अँकरिंग करत आहे. बुमराहची पाच विकेट्स घेतल्याची कामगिरी खालीलप्रमाणे!