एक काळ असा होता कि BCCI ला पैसे देऊन Match ब्रॉडकास्ट करावी लागत होती, पण आज BCCI एवढे श्रीमंत आहे कि..

वयाच्या अवघ्या २० वर्षी भारतीय क्रिकेटमधून पदार्पण करणारा बुधी कुंदरन हा क्रिकेटर त्याची टेस्ट मॅच पूर्ण झाली की बाकड्यावर जाऊन झोपायचा. या मगच कारण अगदी साधं होतं, कारण त्याच्याकडे पैसेच नव्हते! भारताचा एवढा मोठा क्रिकेटर मॅच संपल्यावर बागेतल्या बाकड्यावर जाऊन झोपतो ही गोष्ट आजच्या काळात कोणाला तरी खरी वाटेल का? हो पण हे खर आहे! या सगळ्या गोष्टींना खूप वर्ष झाली, या वर्षात जग देखील खूपच बदलले आणि सोबतच भारतीय क्रिकेट देखील! भारतातील साधे क्रिकेट आता ग्लॅमरस इंटरनॅशनल लेवल पर्यंत जाऊन पोहोचलेले आहे. भारतीय क्रिकेटर आता अगदी इंटरनॅशनल क्रिकेट न खेळता ही कित्येक कोटींमध्ये पैसे कमावताना दिसतात.

हेतर यापुढे काहीच नाही, सध्या पाहिले तर आयपीएल च्या २०२३ ते २०२७ च्या हंगामासाठी टीव्ही आणि डिजिटल लाईट चा लिलाव सुरू आहे. रविवारी या लिलावाचा पहिला दिवस संपला, तेव्हा याने तब्बल ४३ हजार कोटींचा आकडा देखील पार केलेला! म्हणजे एका मॅचसाठी आता बीसीसीआयला १०० कोटींपेक्षा जास्त रक्कम मिळणार तेही नुसते मॅच दाखवायचे!

२०१७ मध्ये बीसीसीआयचे नेटवर्थ १५ हजार कोटी रुपये इतक होतं. तर २०२०-२१ मध्ये हा आकडा १८ हजार कोटींच्या घरात गेला होता! तेही प्लेअर्स पासून सगळ्या स्टेट असोसिएशनला पैसे देऊनही यात बीसीसीआयने खोऱ्याने पैसे ओढले आहेत!

कोण्या एकेकाळी ज्या टीमचे प्लेयर बागेत बाकड्यावर झोपायचे, ज्यांच्याकडे देशासाठी वर्ल्ड कप जिंकून आलेल्या संघाला बक्षीस म्हणून देण्यासाठी देखील पैसे नव्हते.. ही बीसीसीआय इतकी श्रीमंत कशी काय झाली? हा प्रश्न सामान्य नागरिकांना नक्कीच पडला असेल.

याची सुरुवात झाली ती १९८७ च्या वर्ल्डकप मध्ये! ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी बक्कळ पैसा लागणार होता आणि या पैशासाठी स्पॉन्सर देखील! त्यावेळी बीसीसीआयचे अध्यक्ष एन के पी साळवे आणि त्यांचे सहकारी जगमोहन दालमिया यांनी यासाठी अनेक कंपन्यांना ऑफर दिली आणि यातून पुढे आलं ते म्हणजे रिलायन्स!! आणि यामुळे हा वर्ल्डकप लोकांच्या मनात आणि बीसीसीआय रिलायन्स नातं पैशाच्या हिशोबात सुपरहिट बसल.

मीडिया राईट्स मदतीने बीसीसीआय पुढे सुरू झाला धनवर्षाव!

View this post on Instagram

A post shared by Jay Shah (@jayshah220988)

खुप वर्ष आधी दूरदर्शन वर मॅचेस दाखवायचे पैसे घेण्यात येत होते, त्यांनीच २००० मध्ये बीसीसीआयला चार वर्षासाठी तब्बल २४० कोटी रुपये एवढी रक्कम दिली. २००६ मध्ये निंबसने चार वर्षांसाठी ५४९ मिलीयन डॉलर्स मध्ये मीडिया राईट्स विकत घेतले आणि त्यामुळे एका नव्या पर्वाचा उदय झाला! तो म्हणजे २००८ मध्ये जेव्हा बीसीसीआयने आयपीएल नावाचं सोनेरी स्वप्न जागतीक क्रिकेटप्रेमींना दाखवलं!

आयपीएलच्या रुपात क्रिकेट च्या मनोरंजनाला ग्लॅमरचा तडका मिळाला आणि जणू काही घबाडच मिळालं! पहिल्याच वर्षी सोनीने ९१८ मिलीयन डॉलर्स एवढी रक्कम देत १० वर्षासाठी बीसीसीआय सोबत करार केला आणि २००८ ची आयपीएल प्रचंड हिट झाली!!
ही मॅच फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरातून पाहण्यात आली. त्यामुळे आयपीएलची एवढी लोकप्रियता बघून बीसीसीआयने सोनी सोबतचा कॉन्ट्रॅक्ट बदलंत २००९ मध्ये १० वर्षासाठी १.६३ बिलियन डॉलर्स एवढा करार केला.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप