जगप्रसिद्ध गूगलचे सर्वांचे लाडके सिईओ सुंदर पीचाई यांचे सकाळचे रुटीन जाणून धक्काच बसेल!!

आज गूगल सारखी मोठी यंत्रणा चालवणे हे काही सोपे काम नाही. म्हणूनच सुंदर पिचाई यांनी आज जे काही मिळवले आहे ते सर्व आपल्या अखंड मेहनतीच्या ताकदीवर मिळवले आहे यात कोणाचेच दुमत नाही! आज लाखो तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या सुंदर पीचाई यांचे आजचे सकाळचे रुटीन कसे असेल याबाबत सर्व नेटकऱ्यांना कायमच उत्सुकता लागलेली असते.

आज जगात अशी कोणी व्यक्ती नसेल जी गुगल चे सीईओ सुंदर पिचाई यांना ओळखत नसेल! स्वकर्तृत्वाच्या बळावर यश मिळवत त्यांनी सगळं प्राप्त केल आहे आणि आज कित्येक तरुणांचे ते आदर्श बनले आहेत!

टेक मॅक्झिन देण्यात आलेल्या एका मुलाखतीत सुंदर पिचाई यांनी याबाबतचा खुलासा केलेला आहे की, ते गुड मॉर्निंग रुटीन फॉलो करतात. त्यामुळे वयाच्या अगदी ४६ व्या वर्षीही ते एकदम फिट दिसतात. सुंदर पीचाई जगातील सर्वाधिक पगार घेणारे सीइओ मानण्यात येतात. पण तुम्हाला हे माहित आहे का? की त्यांची जीवनशैली ही अतिशय साधी आहे! या लेखातून आपण सुंदर पिचाई यांचा दिनक्रम कसा आहे ते जाणून घेऊया..

कधी कधी जातात जीमला…: पिचाई सकाळी जीम नाही करत पण दिवसभरातून त्यासाठी थोडा वेळ काढण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे.

असे बनले गुगलचे सीईओ…

२०१८ मध्ये Forbes ने जगातील सर्वात प्रतिष्ठीत सीईओ म्हणून सुंदर पिचाई यांना लेबल केलेले! त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात त्यांनी साहित्य अभियंता म्हणून केली आणि २००४ दरम्यान ते गुगलमध्ये व्यवस्थापन एक्झिक्युटिव्ह म्हणून समाविष्ट झाले. यानंतर ते कंपनीचे उत्पादन प्रमुख बनले आणि नंतर गुगल चे सीईओ!!

View this post on Instagram

A post shared by Sundar Pichai (@sundarpichai)

ऑफिस मध्ये फिरत घेतात कामाचा आढावा…

पिचाई यांना चालायला भरपूर आवडते. ते अनेकदा त्यांच्या ऑफिसमध्ये चालत फिरताना दिसतात. कधी कधी तर ते मीटिंगमध्ये ही चालत चालताना दिसतात. चालताना चांगल्या आयडिया मनात येतात असा त्यांचा विश्वास आहे!

पिचाई आहेत चहा प्रेमी…

सकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान उठणारे पिचाई नाश्त्यात टोस्ट सोबत अंडी खातात आणि चहा देखील पितात!
सकाळी वृत्तपत्र वाचत त्यांच्या दिवसाची सुरुवात होते. वॉल स्ट्रीट जर्नल वाचत असताना त्यांची न्याहारी होते.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप