आपण सर्वच आयपीएलचे चाहते आहोत आणि जेव्हा देशात आयपीएल सुरू होते, तेव्हा वेगळे काही विशेष उरत नाही. आयपीएल हा राष्ट्रीय स्तरावरील खेळ आहे जो दरवर्षी देशात आयोजित केला जातो. अनेक भारतीय खेळाडूंसोबतच अनेक परदेशी खेळाडूही आयपीएलमध्ये सहभागी होतात. कोरोनाच्या काळात बहुतांश खेळांचे सामने रद्द झाले होते, तेव्हाही लॉकडाऊनच्या मध्यावर यूएईमध्ये आयपीएल सामन्याचे आयोजन करण्यात आले होते आणि यावेळीही आयपीएलला लोकांचे भरभरून प्रेम मिळाले. या वर्षी सुद्धा IPL ला तेवढेच भरभरून प्रेम मिळत आहे कारण या वर्षी ८ नाहीत तर तब्बल १० संघ एकमेकांसमोर मैदानात उतरले आहेत.
इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२२ मध्ये चित्र काही वेगळे दिसत आहे कारण ज्या बलाढ्य टीम आहेत त्या यंदा फारशी चांगली कामगिरी करताना दिसल्या नाहीत परंतु नव्याने आयपीएल मध्ये उतरणाऱ्या टीम्स मात्र चांगली कामगिरी करत आहे.तसेच, अनेक नवी चेहरे आपल्याला चांगली कामगिरी करताना दिसत आहेत.यातच एक म्हणजे राजस्थान रॉयल्स (RR) कडून खेळणारा सलामीवीर फलंदाज देवदत्त पडिक्कल याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
View this post on Instagram
पडिक्कल कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात सलामीला आला होता आणि यादरम्यान त्याने आयपीएलमध्ये त्याच्या १००० धावा पूर्ण केल्या. त्याने ३५ डावांमध्ये १००० धावा पूर्ण केल्या आहेत आणि ऋषभ पंतसह आयपीएलमध्ये १००० धावा करणारा संयुक्त तिसरा भारतीय फलंदाज बनला आहे.
ही कामगिरी करताना पडिक्कलने महेंद्रसिंग धोनी आणि गौतम गंभीरसारख्या दिग्गजांना मागे टाकले आहे. गौतम गंभीरने ३६ डावांत १००० आयपीएल धावा पूर्ण केल्या होत्या, तर धोनी आणि रोहित शर्मासारख्या फलंदाजांना १००० धावा करण्यासाठी ३७ डाव खेळावे लागले. पडिक्कलने कोलकाताविरुद्ध १८ चेंडूत २४ धावा केल्या. त्याने या खेळीत तीन चौकार आणि एक षटकार लगावला. पडिक्कलने आयपीएलच्या पदार्पणातच ४७३ धावा केल्या होत्या.
कर्नाटकसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर, पडिक्कलला २०२० मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. पडिक्कलने पहिल्या सत्रातच शानदार फलंदाजी केली आणि १५ सामन्यात सुमारे ३२ च्या सरासरीने ४७३ धावा केल्या. पडिक्कलने पहिल्या सत्रात पाच अर्धशतके झळकावली होती.