या २ गोलंदाजांना प्लेइंग ११ मध्ये मिळत नाही संधी, त्यांच्यामध्ये आहे सामना फिरवण्याची ताकत..!

दक्षिण आफ्रिके विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी ऋषभ पंत टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. या मालिकेसाठी टीम इंडियामध्ये दोन अनकॅप्ड खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे, याशिवाय अनेक युवा खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिके विरुद्ध टी-२० मधील ५ सामन्यांपैकी ३ सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने दोन आणि टीम इंडियाने एका सामन्यात विजय मिळवला आहे. आज आम्ही अशा तीन खेळाडूंबद्दल सांगणार आहोत ज्यांना एकाही सामन्यात संधी मिळाली नाही. मात्र, त्यांची कामगिरी उत्कृष्ट झाली आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत आता पर्यंत ३ सामने खेळले गेले आहेत. या तीन सामन्यांमध्ये टीम इंडियाकडून एकाही सामन्यात तीन गोलंदाजांचा समावेश करण्यात आलेला नाही. मात्र, आयपीएलच्या या मोसमात चांगली कामगिरी केली आहे. मात्र, पुढील सामन्यासाठी त्यांचा संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो अशी अपेक्षा आहे.

रवी बिश्नोई
रवी बिश्नोईने २०२२ मध्ये टीम इंडियासाठी टी-२० फॉरमॅटमध्ये पदार्पण केले होते. बिश्नोईने यावर्षी श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत पदार्पण करताना ४ सामन्यात ४ विकेट घेतल्या होत्या. यानंतर तो आयपीएल २०२२ मध्ये लखनऊ सुपर जायंट्समध्ये सामील झाला होता. त्याने लखनौ सुपर जायंट्ससाठी १४ सामन्यांत ८.४४ च्या इकॉनॉमी रेटने १३ विकेट घेतल्या होत्या. बिश्नोईच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे तर त्याची लाईन आणि लेन्थ अगदी अचूक आहे. आयपीएलच्या या मोसमातील त्याची कामगिरी पाहून त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी संधी देण्यात आली होती, मात्र आतापर्यंत त्याला ३ सामन्यांतून एकदाही प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालेले नाही. पुढील सामन्यात त्यांना संधी दिली जाऊ शकते, अशी अपेक्षा आहे.

उमरान मलिक
उमरान मलिक आयपीएलच्या शेवटच्या मोसमा पासून त्याच्या वेगाने प्रसिद्ध आहे. वेगाचा बादशाह म्हटला जाणारा उमरान मलिक सतत १५० kmph च्या वेगाने चेंडू फेकताना दिसला आहे. IPL २०२२ मध्ये उमरान मलिकने १४ सामन्यात ९.०३ च्या इकॉनॉमी रेटने २२ विकेट घेतल्या होत्या. सनरायझर्स हैदराबादसाठी उमरान मलिक हा या मोसमातील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. या २२ वर्षीय गोलंदाजाची ही कामगिरी पाहून त्याचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टीम इंडियाच्या संघात समावेश करण्यात आला आहे, मात्र अद्याप त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेली नाही. उमरान मलिक अजूनही टीम इंडियात पदार्पण करण्यासाठी तळमळत आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप