या ३ खेळाडूंनी IPL २०२२ च्या पहिल्या आठवड्यात आपल्या तगड्या कामगिरीने चाहत्यांना केले थक्क..!

IPL च्या १५ व्या हंगामाची सुरुवात २६ मार्च रोजी CSK आणि KKR यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्याने झाली आणि KKR हा हंगामातील पहिला सामना जिंकणारा संघ बनला. आयपीएल च्या इतिहासा च्या मागील आवृत्त्यां प्रमाणेच या वर्षीही असे अनेक विक्रम केले जात आहेत, ज्यांची कोणी कल्पनाही केली नसेल. या हंगामात दोन नवीन संघ जोडले गेले आहेत, ज्यामुळे हे रेकॉर्ड आणखी वाढतील. या नवीन आवृत्तीत आता पर्यंत ९ सामने खेळले गेले आहेत. या सामन्या दरम्यान, सर्व संघातील काही निवडक खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्या सोबतच या खेळाडूंनी आपल्या चाहत्यांची मनेही जिंकली आहेत. आम्ही अशा ३ खेळाडूं बद्दल सांगणार आहोत ज्यांनी आयपीएल २०२२ च्या पहिल्या आठवड्यात आपल्या उत्कृष्ट कामगिरीने आपल्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे.

उमेश यादव – पर्पल कॅप: KKR च्या फ्रँचायझीने भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवला २ कोटी रुपये खर्चून IPL मेगा लिलावात संघाचा भाग बनवले होते. पण त्या वेळी उमेश या मोसमाच्या पहिल्या आठवड्यात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज असेल असे कुणालाही वाटले नव्हते. तुम्हाला सांगतो, उमेशने सध्या सुरू असलेल्या आयपीएल सीझनमध्ये ३ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ७.३८ च्या सरासरीने ८ विकेट्स घेतल्या आहेत. या तीन सामन्यांमध्ये उमेशने दोनदा सामनावीराचा पुरस्कारही पटकावला आहे.

भानुका राजपक्षे (पंजाब किंग्स): ३० वर्षीय भानुका राजपक्षेने आयपीएलच्या या हंगामात पंजाब किंग्जकडून खेळताना पदार्पण केले होते. पहिल्या काही सामन्यां मध्ये जॉनी बेअरस्टोच्या अनुपस्थिती मुळे राजपक्षेला प्लेइंग इलेव्हन मध्ये त्याच्या जागी खेळण्याची संधी मिळाली होती. ज्याचा राजपक्षेने पुरेपूर फायदा घेतला आहे. या दोन सामन्यांमध्ये राजपक्षेने २३८.७ च्या स्ट्राइक रेटने ७४ धावा केल्या आहेत. राजपक्षे हा पंजाबसाठी या स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. आता जॉनी बेअरस्टो संघात सामील झाल्यानंतरही राजपक्षे प्लेइंग इलेव्हन मध्ये राहणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

ललित यादव (दिल्ली कॅपिटल्स): ललित यादवने गेल्या वर्षी मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स कडून खेळून आपल्या आयपीएल कारकिर्दीला सुरुवात केली होती. यंदाच्या मेगा लिलावात पुन्हा एकदा दिल्ली फ्रँचायझीने या खेळाडूला ६५ लाख रुपयांना खरेदी केले होते. संघ व्यवस्थापनाने ललितवर लावलेला हा सट्टा यावेळी व्यर्थ गेला नाही. या मोसमातील पहिल्याच सामन्यात ललितने ३८ चेंडूत नाबाद ४८ धावा केल्या. या खेळीत ललितने १२६.३ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना ४ चौकार आणि २ षटकार मारले होते. ललितच्या या खेळीमुळे दिल्लीने या सामन्यात मुंबईचा ४ विकेट्सने पराभव केला होता.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप