एक काळ असा होता जेव्हा महेंद्रसिंग धोनीने टीम इंडियाला T-२० ते ODI वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवून दिली होती. यादरम्यान अनेक खेळाडूंना एमएस धोनी च्या नेतृत्वाखाली टीम इंडिया कडून खेळण्याची संधी मिळाली होती. त्याचबरोबर धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियात पदार्पण करणारे हे ५ खेळाडू होते पण आता ते टीम इंडियातुन बाहेर आहेत.
एमएस धोनी हा टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार मानला जातो. त्याने त्याच्या नेतृत्वाखाली अनेक खेळाडूंना संधी दिली होती. त्याच्या नेतृत्वाखाली अनेक खेळाडू उदयास आले होते आणि अनेक खेळाडू अपयशी ठरले होते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही अयशस्वी खेळाडूं बद्दल सांगणार आहोत, ज्यांनी धोनीच्या नेतृत्वाखाली पदार्पण केले पण आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरले.
बरिंदर सरन
बरिंदर सरनने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियासाठी पदार्पण केले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण केल्यानंतर त्याने टीम इंडियासाठी ६ एकदिवसीय आणि २ टी-२० सामने खेळले होते. ८ सामने खेळल्यानंतर त्याला पुन्हा टीम इंडियामध्ये संधी मिळू शकली नाही. तो टीम इंडियामध्ये आपली जागा टिकवून ठेवू शकला नाही. सरनने ६ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५.३४ च्या इकॉनॉमी रेटने ७ विकेट घेतल्या, तर T-२० मध्ये त्याने २ सामन्यांमध्ये ५.१२ च्या इकॉनॉमी रेटने ६ विकेट घेतल्या होत्या. याशिवाय त्याने आयपीएलच्या २४ सामन्यात १८ विकेट घेतल्या होत्या.
मनदीप सिंग
मनदीप सिंगने आयपीएल मध्ये वेगळी ओळख निर्माण केली होती. त्याने २०१६ साली झिम्बाब्वे विरुद्ध एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियासाठी पदार्पण केले होते. झिम्बाब्वे विरुद्ध च्या या मालिकेत मनदीप सिंगला ३ सामने खेळण्याची संधी मिळाली ज्यात त्याने ४३.५ च्या सरासरीने ८७ धावा केल्या होत्या. मात्र या मालिके नंतर त्याला पुन्हा टीम इंडियात संधी देण्यात आली नाही. मनदीप सिंगला आयपीएलमध्ये संधी मिळाली, जिथे त्याने १०८ सामने खेळले आणि २१.४ च्या सरासरीने १६९२ धावा केल्या होत्या.
फैज फजल
फैज फजलने २०१६ मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियासाठी पदार्पण केले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला संधी न मिळाल्याने तो केवळ एकच सामना खेळून बेनामी झाला. त्याने झिम्बाब्वेविरुद्ध पदार्पण करताना पहिल्याच सामन्यात ५५ धावा केल्या होत्या. याशिवाय आयपीएल मध्ये ही त्याला फारशी संधी मिळाली नाही. फैजने आयपीएल मध्ये केवळ १२ सामने खेळले आणि १८.३ च्या सरासरीने १८३ धावा केल्या होत्या.