CSK नवा कर्णधार बनू शकतात हे ३ खेळाडू , धोनीने केला आहे परफेक्ट गेम..!

चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल २०२२ मधून बाहेर पडला आहे. त्याच बरोबर ८ सामन्यात ६ पराभवा नंतर सीएसके चा नवा कर्णधार रविंद्र जडेजा ने ही धोनी कडे पुन्हा कर्णधार पद सोपवले होते. रवींद्र जडेजा ने कर्णधार पद सोडले आणि धोनी चे वय पाहता सीएसके ला आता पुढील हंगामा साठी नव्या कर्णधाराची गरज भासणार आहे. या ३ खेळाडूं पैकी एका खेळाडूला पुढील हंगामा साठी चेन्नई सुपर किंग्ज कर्णधार बनवू शकते.

रुतुराज गायकवाड : २५ वर्षीय रुतुराज गायकवाड तरुण असून तो ज्या लयीत फलंदाजी करत आहे, ते पाहता तो सीएसके च्या संघात बराच काळ असेल असे वाटत आहे. अशा परिस्थितीत चेन्नई सुपर किंग्ज चे व्यवस्थापन या खेळाडूला पुढील मोसमा साठी कर्णधार म्हणून तयार करू शकते. रुतुराज गायकवाड ने आयपीएल च्या ३४ सामन्यांत ३८.४ च्या शानदार सरासरी ने ११५२ धावा केल्या आहेत.

मोईन अली: इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली कडे पुढील हंगामात सीएसके चे नशीब फिरवण्याची ताकद आहे. मोईन अली कडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट चा भरपूर अनुभव आहे, व तो बराच काळ आयपीएल खेळत आहे. मोईन अली ची अष्टपैलू कामगिरी पाहता, CSK व्यवस्थापन कदाचित या खेळाडूला IPL २०२३ पूर्वी त्यांचा कर्णधार बनवू शकते.

दीपक चहर: धोनी च्या सर्वात प्रिय खेळाडूं पैकी एक, दीपक चहर हा आयपीएल २०२२ मधून बाहेर पढला होता. दीपक चहर दुखापती मुळे आयपीएल मधून बाहेर आहे. त्याला या मोसमात जास्त सामने खळण्याची संधी मिळाली नाही. त्याच वेळी आयपीएल २०२२ मेगा- लिलावात, सीएसके ने या खेळाडू ला १४ कोटी रुपया मध्ये आपल्या संघात समाविष्ट केले होते. अशा स्थितीत पुढील मोसमात धोनीचा CSK मोठा सट्टा खेळून चहरला कर्णधार बनवू शकतो.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप