क्रिकेटच्या सुरुवातीच्या काळात फलंदाज बचावात्मक शैलीत फलंदाजी करायचे. बदलत्या काळानुसार फलंदाजांची शैलीही बदलत गेली. एकदिवसीय क्रिकेट आणि टी-२० सारख्या फॉरमॅटने त्यात क्रांती घडवली आहे. आता फलंदाज केवळ वेगाने धावा काढत नाहीत, तर मोठे फटके मारण्यासही मागे हटत नाहीत.
क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅट मध्ये तुम्हाला एका चेंडूवर सर्वाधिक धावा करायच्या असतील, तर त्यासाठी तुम्हाला षटकार मारावा लागेल. सध्या प्रत्येक संघात असे अनेक फलंदाज आहेत जे सहज षटकार ठोकू शकतात. तसे, क्रिकेटच्या इतिहासात कोणत्या फलंदाजाने सर्वात लांब षटकार मारला हे तुम्हाला माहिती आहे का? आज या लेखात आम्ही अशा टॉप ५ फलंदाजांबद्दल सांगणार आहोत ज्यांच्या नावावर सर्वात लांब षटकार मारण्याचा विक्रम आहे.
१) अल्बर्ट ट्रॉट (इंग्लंड विरुद्ध – १६४ मी).
अल्बर्ट ट्रॉट हा १९ व्या शतकातील सर्वात धोकादायक फलंदाजांपैकी एक होता. अल्बर्ट इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांसाठी क्रिकेट खेळला आहे. क्रिकेट इतिहासातील सर्वात लांब षटकार मारण्याचा विक्रम अल्बर्ट ट्रॉटच्या नावावर आहे. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर त्याने इंग्लंडविरुद्ध १६४ मीटर षटकार मारला होता. हा षटकार इतका लांब होता की चेंडू मैदानाबाहेर जाऊन पडला होता.
२) शाहिद आफ्रिदी ( इंग्लंड विरुद्ध – १५८ मी).
पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी त्याच्या धोकादायक फलंदाजीसाठी ओळखला जात होता. तो मैदानात येताच चाहते बूम-बूम आफ्रिदी म्हणायचे. २००६ मध्ये ब्रिस्टलच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध खेळताना आफ्रिदीने १५८ मीटर चा षटकार मारला होता. क्रिकेटच्या इतिहासातील हा दुसरा सर्वात मोठा षटकार आहे. या सामन्यात आफ्रिदीने १४ चेंडूत तुफानी पद्धतीने २८ धावा केल्या होत्या. या खेळीत आफ्रिदीने १ गगनचुंबी षटकार आणि ५ चौकार मारले होते.
३) ब्रेट ली (वेस्ट इंडीज विरुद्ध – १३६ मी).
या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीचाही समावेश आहे. ब्रेट ली जितका स्फोटक फलंदाज होता तितकाच तो प्रतिभावान गोलंदाज होता. शेवटच्या काही षटकांमध्ये तो त्याच्या तुफानी फलंदाजीसाठी ओळखला जात होता. ब्रेटलीने २००५ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध रोव्हमन पॉवेलच्या चेंडूवर १३६ मीटर लांब षटकार मारून चेंडू स्टेडियमच्या बाहेर टाकला होता.
४) युवराज सिंग (ऑस्ट्रेलिया विरुद्ध- १२५ मी)
भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू युवराज सिंग याला त्याचे चाहते सिक्सर किंग म्हणूनही ओळखतात. T-२० विश्वचषक २००७ मध्ये युवराजने एका षटकात ६ चेंडूत ६ षटकार मारून इतिहास रचला होता. याच विश्वचषकात युवराजने ऑस्ट्रेलिया विरुद्ध कारकिर्दीतील सर्वात मोठा षटकारही मारला होता.