२०१७ विश्वचषक फायनल आणि २०२२ कॉमनवेल्थ गेम्स मधील भारताच्या पराभवाची ही ४ कारणे..!

ब्रिटनमधील बर्मिंगहॅम येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स २०२२ क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलिया कडून ९ धावांनी पराभूत झाला होता. भारतीय महिला क्रिकेट संघ अंतिम फेरीत पोहोचण्याची गेल्या पाच वर्षात ही तिसरी वेळ आहे पण त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. २०१७ च्या ५० षटकांच्या महिला विश्वचषक स्पर्धेत भारताला रोमहर्षक सामन्यात इंग्लंड विरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. २०१७ मध्‍ये भारताचा पराभव आणि कॉमनवेल्थ गेम्सच्‍या फायनल मध्‍ये खूप साम्य आहे.

इंग्लंडने अनेक मोठ्या क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले आहे. २०१७ मध्ये झालेल्या ५० षटकांच्या विश्वचषकाचे यजमानपद इंग्लंडकडे होते. लॉर्ड्सच्या मैदाना वर भारत आणि इंग्लंड संघ यांच्यात अंतिम सामना झाला होता. कॉमनवेल्थ गेम्स क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंड मधील एजबॅस्टन येथे खेळला गेला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Team India (@indiancricketteam)


आणखी एक रंजक योगायोग असा की विमेन इन ब्लू संघाने लक्ष्याचा पाठलाग करताना दोन्ही सामन्यात ९ धावांनी हार पत्करली होती. २०१७ मध्ये इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ७ विकेट गमावून २२८ धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ २१९ धावांवर ऑल आऊट झाला होता. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने २० षटकात ८ विकेट गमावून १६१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताचा डाव १९.३ चेंडूत १५२ धावांवर आटोपला होता.

सध्याची भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने दोन्ही फायनल मध्ये अर्धशतके झळकावली होती, पण संघाचा विजय निश्चित करण्यात ती अपयशी ठरली होती. २०१७ च्या फायनल मध्ये, हरमनप्रीत कौरने चौथ्या क्रमांका वर फलंदाजी करताना ८० चेंडूत ५१ धावांची खेळी खेळली होती, यादरम्यान तिने तीन चौकार आणि दोन षटकारही मारले होते. कॉमनवेल्थ गेम्सच्या अंतिम सामन्यात हरमनप्रीतने ४३ चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ६५ धावा केल्या होत्या. यादरम्यान तिचा स्ट्राइक रेट १५१.१६ होता.

भारताची सलामीवीर स्मृती मानधना हिची बॅट दोन्ही अंतिम सामन्यात शांत होती. त्यानंतर २०१७ मध्ये हरमनप्रीत कौरने भारतीय सलामी वीर पूनम राऊत सोबत तिसऱ्या विकेट साठी १२९ चेंडूत ९५ धावांची भागीदारी केली होती. ऑस्ट्रेलिया विरुद्ध बर्मिंगहॅम मध्ये सलामीवीरांनी पुन्हा एकदा भारताची निराशा केली, त्यानंतर भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने युवा फलंदाज जेमिमा रॉड्रिग्जसह तिसऱ्या विकेट साठी ७१ चेंडूत ९६ धावांची भागीदारी केली. मात्र हे दोन्ही फलंदाज भारताला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊ शकले नाहीत.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप