अनेक वेळा एखाद्या व्यक्तीला त्याच्या निर्णयाचा पश्चाताप होतो. काही मोठ्या स्टार्ससोबतही असंच काहीसं घडलं आहे. त्त्यांच्याकडे एक मोठी संधी होती, पण लोकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण करू शकले नाहीत.येथे आम्ही त्या पाच अभिनेत्यांबद्दल सांगणार आहोत ज्यांना टीव्हीचा प्रसिद्ध शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मध्ये जेठालाल बनण्याची संधी मिळाली होती, परंतु त्यांनी नकार दिला होता.
पुढे हे पात्र दिलीप जोशी याच्याकडे गेले आणि त्याचे परिणाम सर्वांसमोर आहेत. आज क्वचितच कोणी असेल ज्याला जेठालालचे पात्र माहित नसेल. साधारण अभिनेत्या पासून खास बनलेला दिलीप जोशी स्वतःला भाग्यवान समजतो की त्याला जेठालालच्या भूमिकेत काम करायला मिळाले. आपल्या एका मुलाखतीत जुने दिवस आठवून दिलीप जोशी म्हणाला. “तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेला हो म्हणण्यापूर्वी माझ्याकडे एक वर्षाहून अधिक काळ काही काम नव्हते. मी ज्या मालिकेत काम करत होतो ती संपली होती. माझ्यासाठी तो कठीण काळ होता. मी काय करावे हे समजत नव्हते. मी माझे क्षेत्र बदलावे असे मला वाटले होते. पण देवाच्या कृपेने मला तारक ‘मेहता का उल्टा चष्मा’ मध्ये काम करण्याची ऑफर आली.
अली असगर- जेठालालच्या भूमिकेसाठी अली निर्मात्यांची पहिली पसंती होती. पण अलीला वेळ काढता आला नाही आणि ही भूमिका त्याच्या हातून गेली. अलीने कहानी घर घर की, कुटुंब, कॉमेडी सर्कस, कॉमेडी नाईट्स विथ कपिल यांसारख्या शोमध्ये काम केले आहे.
किकू शारदा- किकू शारदा, आजकाल ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये दिसत आहे आणि त्याच्या जबरदस्त कॉमिक टायमिंगसाठी तो प्रसिद्ध आहे. किकूलाही जेठालालच्या भूमिकेसाठी विचारण्यात आले होते, पण त्याने त्यास नकार दिला होता. मिळालेल्या माहितीनुसार, त्याला कोणतीही पूर्णवेळ मालिका करायची नव्हती. स्टँड-अप कॉमेडी मध्ये तो खूश होता.
राजपाल यादव- राजपाल यादव हा टीव्ही सोबतच हिंदी चित्रपटसृष्टीचा एक प्रसिद्ध चेहरा आहे. त्याला फक्त बॉलिवूडवर लक्ष केंद्रित करायचे होते. त्याला टेलिव्हिजन वर काम करायचे नव्हते. त्यामुळेच त्याने जेठालाल च्या भूमिकेची ऑफर नाकारली होती.
योगेश त्रिपाठी- योगेश त्रिपाठी ‘भाबीजी घर पर हैं’ आणि ‘हप्पू सिंह की उल्टान पलटन’ मध्ये दिसत आहे. मिळालेल्या माहिती नुसार, त्याला जेठालाल च्या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती, परंतु तो दुसऱ्या शोच्या शूटिंग मध्ये व्यस्त असल्याने त्याने त्याला नकार दिला होता.