क्रिकेटमधील या ५ बाप आणि मुलाच्या जोड्या जे एकत्र एक सामना खेळले आहेत..!

मुलगा आपल्या आयुष्यात तेच करिअर निवडतो ज्यामध्ये त्याच्या वडिलांनी चांगले स्थान मिळवले आहे. यात काही लोक यशस्वी होतात तर काही अयशस्वी. क्रिकेट मध्ये अनेकदा असे दिसून आले आहे की क्रिकेटपटूची मुलंही त्याच क्षेत्रात करिअर करण्या साठी बाहेर पडतात. आज आम्ही तुम्हाला अशाच पाच पिता-पुत्र जोडी बद्दल सांगणार आहोत, जे एकाच सामन्यात एकत्र क्रिकेट खेळले आहेत.

डेनिस स्ट्रीक- हीथ स्ट्रीक
डेनिस हा झिम्बाब्वेचा खेळाडू होता ज्याने आपल्या देशा साठी फक्त २ कसोटी सामने खेळले कारण झिम्बाब्वेला त्यावेळी कसोटी खेळण्याचा दर्जा नव्हता. पण त्याच्या मुलाने चांगली कामगिरी करत २००० धावा केल्या आणि २१७ विकेट्स घेतल्या होत्या. १९९६ मध्ये जेव्हा डेनिस ११ वर्षांच्या कालावधी नंतर प्रथम श्रेणी क्रिकेट मध्ये परतला तेव्हा त्याला त्याच्या मुला सोबत गोलंदाजी करण्याची संधी मिळाली होती.

लाला अमरनाथ- सुरेंद्र अमरनाथ
लाला अमरनाथ यांना कोण ओळखत नाही? लालाजी हे भारतीय क्रिकेट मधील सर्वात जुने खेळाडू होते. १९३३ मध्ये भारता कडून पदार्पण करणाऱ्या लाला अमरनाथ यांनी एकूण २४ कसोटी सामने खेळले होते. यानंतर लालाचा मुलगा सुरेंद्र अमरनाथ यानेही भारता साठी १० कसोटी सामने खेळले आहेत. पण कदाचित त्याच्या कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय सामना तो असेल ज्याच्यात वडिलांसोबत खेळला होता. १९६३ मध्ये बॉम्बे मध्ये एका धर्मादाय सामन्या दरम्यान, ५२ वर्षीय लाला अमरनाथ आणि त्यांचा १५ वर्षांचा मुलगा सुरेंदर अमरनाथ एकाच संघा साठी एकत्र खेळले होते.

सुनील गावस्कर – रोहन गावस्कर
सुनील गावस्कर हा भारताच्या महान सलामी वीरा पैकी एक आहे. त्याचा मुलगा रोहन गावस्कर यानेही भारतीय संघा साठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये भाग घेतला आहे. रोहन गावस्करची भारतीय संघातील निवड एकेकाळी वादाचा विषय बनला होता.

शिवनारायण चंद्रपॉल- तेजनारायण चंद्रपॉल
शिवनारायण चंद्रपॉल हा वेस्ट इंडिज साठी सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा खेळाडू आहे. शिवनारायण चंद्रपॉल ने वर्षानु वर्षे वेस्ट इंडिज क्रिकेटची सेवा केल्यानंतर २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली, परंतु त्यानंतरही तो देशांतर्गत क्रिकेट खेळत राहिला. अशाच एका प्रसंगी शिवनारायण चंद्रपॉल आणि त्याचा मुलगा तेज नारायण चंद्रपॉल यांनी २०१७ मध्ये एकाच संघा साठी देशांतर्गत क्रिकेट सामना खेळला होता. त्या सामन्यात दोघांनी २५६ धावांची भागीदारीही केली होती.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप