भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतक बनवणारे हे ४ फलंदाज..!

जर आपण भारतीय क्रिकेट बद्दल बोललो तर आता पर्यंत अनेक महान फलंदाज येऊन गेले आहेत. क्रिकेटच्या इतिहासावर नजर टाकली तर भारत हा फलंदाजीचा बालेकिल्ला मानला जातो. एकापेक्षा एक सुपरस्टार फलंदाज भारतीय संघाकडून खेळले आहेत. सुनील गावस्कर पासून विराट कोहली पर्यंत असे अनेक फलंदाज झाले आहेत ज्यांनी जागतिक क्रिकेट वर राज्य केले आहे. फलंदाजीचे सर्वाधिक विक्रम या खेळाडूंच्या नावावर आहेत. सचिन तेंडुलकर बद्दल बोलायचे झाले तर त्याने जवळपास सर्व रेकॉर्ड आपल्या नावा वर केले होते.

भारतीय फलंदाजांनी अनेक उत्कृष्ट विक्रम केले आहेत आणि सातत्याने अनेक विक्रम प्रस्थापित करत आहेत. शतके आणि अर्धशतकांच्या बाबतीतही भारतीय खेळाडू पुढे आहेत. या लेखात आम्ही तुम्हाला अशा चार दिग्गज भारतीय खेळाडूंबद्दल सांगणार आहोत ज्यांच्याकडे सर्वाधिक अर्धशतक करण्याचा विक्रम आहे. चला जाणून घेऊया या यादीत कोणते खेळाडू आहेत.

सचिन तेंडुलकर (१६४ अर्धशतक)
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रम मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने आपल्या कारकिर्दीत अनेक मोठे विक्रम केले आहेत आणि हा विक्रमही त्याच्या नावावर आहे. सचिनने ७८२ डावांमध्ये एकूण १६४ अर्धशतके झळकावली होती व १०० शतकांचा विक्रमही सचिनच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकर हा संपूर्ण जगात सर्वाधिक शतके आणि अर्धशतके करणारा फलंदाज आहे. याशिवाय सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.

राहुल द्रविड (१४६ अर्धशतक)
माजी भारतीय क्रिकेटपटू आणि द वॉल म्हणून ओळखला जाणारा राहुल द्रविड सर्वाधिक अर्धशतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत ६०५ डावात १४६ अर्धशतके झळकावली होती.

विराट कोहली (११७ अर्धशतक)
या यादीत विराट कोहली भारतीय संघाचा माजी कर्णधार आहे. कोहली बद्दल बोलायचे झाले तर तो सतत अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर करत आहे. कोहली सचिन तेंडुलकरने बनवलेले विक्रम मोडत आहे. विराट कोहलीने आतापर्यंत एकूण ११७ आंतरराष्ट्रीय अर्धशतके ठोकली आहेत.

सौरव गांगुली (१०७ अर्धशतक)
भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली या बाबतीत चौथ्या क्रमांकावर आहे. तो जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक होता. सौरव गांगुलीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण ४८८ डाव खेळले होते आणि या कालावधीत एकूण १०७ अर्धशतके झळकावली होती. तो भारताकडून T-२० क्रिकेट खेळला नाही.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप