भारतीय क्रिकेट संघात अनेक खेळाडू आले, पण काही खेळाडूच असे राहिले की त्यांना संघाची धुरा सांभाळण्याची संधी मिळाली होती. संघाचा कर्णधार झाल्यानंतरही काही मोजकेच खेळाडू संघाच्या अपेक्षा पूर्ण करू शकतात. अनेक क्रिकेटपटूंनी तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाची कमान सांभाळली आहे. पण फक्त काही खेळाडूंनी जास्त चांगली कामगिरी केली आहे. भारताचे असे काही खेळाडू होते ज्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली भारताला नेहमीच यश मिळवून दिले आहे. त्याचवेळी असे काही खेळाडू होते, ज्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला नाही. आम्ही अशा 3 खेळाडूंबद्दल बोलणार आहोत ज्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ कधीही हरला नाही.
अजिंक्य रहाणे: भारतीय कसोटी संघ बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करत होता. अॅडलेडच्या मैदानावर झालेल्या पराभवानंतर कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेने संघाची धुरा सांभाळली होती. त्याने संघासाठी चांगली कामगिरी केली होती.
अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलियात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत एकूण २ सामने खेळले होते, ज्यामध्ये संघाने एक सामना जिंकला आणि एक सामना अनिर्णित राहिला होता, तर अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या १-१ सामन्यात भारताचे नेतृत्व केले होते व ते सामने जिकले होते. यासह त्याने भारतासाठी ४ सामन्यात ३ सामने जिंकले आणि एक सामना अनिर्णित राहिला होता.
रवी शास्त्री: भारतीय संघाचा प्रशिक्षक रवी शास्त्री याच्या नेतृत्वाखालीही भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला नाही. भारताविरुद्धच्या सामन्यात रवी शास्त्रीने टीम इंडियाची धुरा सांभाळली असली तरी. १९८७-८८ मध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेदरम्यान, रवी शास्त्रीने चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाची धुरा सांभाळली होती. चेन्नईच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात रवी शास्त्रीला संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते. शास्त्रीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने हा सामना २५५ धावांनी जिंकला होता.
के श्रीकांत : श्रीकांतच्या नेतृत्वाखालीही भारतीय क्रिकेट संघाला पराभव पत्करावा लागला नाही. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ एकही कसोटी सामना जिंकू शकला नाही. १९८९ मध्ये भारतीय संघ पाकिस्तानमध्ये कसोटी मालिका खेळण्यासाठी गेला होता, त्यावेळी श्रीकांतला भारतीय कसोटी संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते. त्याच्या नेतृत्वाखाली चारही सामने अनिर्णित राहिले होते. या मालिकेदरम्यान श्रीकांतची कामगिरी फारशी चांगली नव्हती, त्याने ४ सामन्यांच्या ७ डावात केवळ ९७ धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याला पुन्हा संघाची कमान मिळाली नाही. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ एकही सामना हरला नाही, असा हा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला आहे.