९० चा काळात सिनेमांवर वर्चस्व गाजवणारे हे कलाकार आता दिसतात ‘असे’ फोटो पाहून आठवतील जुन्या !

जुन्या पिढीतला बॉलिवूड मधला सगळ्यात सुंदर काळ म्हणजे नव्वदीच्या दशकातला! तेव्हाचे सिनेमे, त्यातले हिरो~हिरोईन त्यांचा अभिनय यांना काही तोडच नव्हती! सध्या सोशल मीडियावर बॉलिवूड स्टार्सचे जुन्या काळातील फोटो अनेकदा व्हायरल होताना दिसतात, हे फोटो पाहून अनेकदा त्या कलाकाराला ओळखणे कठीण होऊन बसते. आज आम्ही तुम्हाला या लेखातून काही कलाकारांचे असेच जुने फोटो दाखवणार आहोत ज्यांचा आज लूक आणि स्टाईल सेंसही बराच बदललेला दिसतो.

फरदीन खान~

ज्येष्ठ अभिनेते फिरोज खान यांचा मुलगा फरदीन खानला अभिनयाचा वारसा आपल्या पित्याकडूनच मिळाला आहे. फरदीने आपल्या सिने कारकिर्दीची सुरूवात ‘प्रेम अगन’ नावाच्या चित्रपटाने केली होती. यातील अभिनयासाठी त्याने फिल्मफेअर अवॉर्डही जिंकलेला. यानंतर तो ‘जंगल’, ‘प्यार तूने क्या किया’, ‘लव के लिए कुछ भी करेगा’ या सारख्या चित्रपटांमधून झळकलेला दिसला.

संजय दत्त~

सुनील दत्त यांसारख्या दिगग्ज कलाकार वडील म्हणून लाभलेल्या संजय दत्तची कहाणी अगदी फिल्मी आहे! १९८१ मध्ये संजय दत्तने ‘रॉकी’ चित्रपटासह हिंदी सिनेसृष्टीत प्रवेश केला होता. राॅकी चित्रपटानंतर संजयने विधाता, जाॅनी आय लव्ह यू, बेकरार, मैं आवारा हूँ, जमीन आसमा अशा काही चित्रपटांमध्ये काम केले. ६१ वर्षांचा संजय अजूनही इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे.

सलमान खान~

मैने प्यार किया या सुंदर चित्रपटात काम करून सलमान खान रातोरात सुपरस्टार बनला. ९० च्या दशकात सलमानने मिळवलेली स्टारडम अजूनही जशीच्या तशीच आहे. ५४ वर्षीय सलमान खानच्या नवनवीन चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर आपल्या कमाईने नवे विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

सैफ अली खान~
छोटा नवाब सैफ अली खानने १९९२ मध्ये ‘परंपरा’ चित्रपटाद्वारे आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली होती. तेव्हा सैफ अली खानच्या अभिनयावर जोरदार टीका झाली होती. चित्रपटांव्यतिरिक्त सैफ आज एक स्टाईल आयकॉन देखील मानण्यात येते. आज सैफ अली खान भारतामधील एक आघाडीचा व यशस्वी अभिनेता मानला जातो.

आमिर खान~


आमिर खानचा पहिला चित्रपट होता तो म्हणजे ‘कयामत से कयामत तक’. या चित्रपटा नंतर त्यांची प्रतिमा चॉकलेट बॉय म्हणून तयार झाली. आमिर आपल्या चित्रपट निवडीबाबत विशेष परिपूर्णतेसाठी खास ओळखला जातो, म्हणून आज तो बॉलिवूड इंडस्ट्री मध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून फेमस आहे.

अक्षय कुमार ~

अक्षय कुमारने चित्रपटात काम करण्यापूर्वी बँकॉकमध्ये एका हॉटेलात वेटर म्हणून देखील काम केलेले आणि जेव्हा तो मुंबईला परत आला तेव्हा एका फोटोग्राफरच्या सांगण्यानुसार त्याने मॉडेलिंग करायला सुरुवात केली. अक्षय कुमारला १९८७ च्या महेश भट्टच्या ‘आज’ या चित्रपटात मार्शल आर्ट इंस्ट्रक्टर म्हणून कास्ट करण्यात आले होते. १९९१ मध्ये प्रदर्शित झालेला त्यांचा पहिला चित्रपट सौगंध या नावाचा होता.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप