आयपीएलच्या एका षटकात सर्वाधिक धावा देणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत या महान गोलंदाजांचा आहे समावेश.!

कोलकाता नाइट रायडर्स (KKR) च्या पॅट कमिन्सने IPL २०२२ च्या हंगामात मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध १४ चेंडूत ५० धावा केल्या होत्या. अशा प्रकारे १४ चेंडूत ५० धावा करणारा पॅट कमिन्स आयपीएल इतिहासातील दुसरा फलंदाज ठरला आहे. या पूर्वी केएल राहुल ने पंजाब किंग्ज कडून (PBKS) खेळताना हा पराक्रम केला होता. पॅट कमिन्स हा आयसीसी क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा कसोटी गोलंदाज आहे. आज आपण IPL इतिहासात १ षटकात सर्वाधिक धावा देणाऱ्या गोलंदाजा बद्दल जाणून घेणार आहोत.

१) परविंदर अवाना: आयपीएल २०१४ च्या मोसमात पंजाब किंग्जचा (पीबीकेएस) गोलंदाज परविंदर अवाना ने १ षटकात ३३ धावा दिल्या होत्या. पंजाब किंग्ज (PBKS) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियम वर हा सामना खेळला गेला होता.

२) डॅनियल सॅम्स: डॅनियल सॅम्स ने IPL २०२२ मध्ये १ षटकात ३५ धावा दिल्या होत्या. हा सामना मुंबई इंडियन्स (MI) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात पुणे एमसीए स्टेडियम वर खेळला गेला होता.

View this post on Instagram

A post shared by Daniel Sams (@dansams)

३)  प्रशांत परमेश्वरन: आयपीएल २०११ मध्ये कोची टस्कर्स केरळ (KTK) गोलंदाज प्रशांत परमेश्वरन ने १ षटकात ३७ धावा दिल्या होत्या. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) विरुद्ध होता. कोची टस्कर्स केरळ (KTK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) यांच्यातील हा सामना चिन्नास्वामी स्टेडियम वर खेळला गेला होता.

४) रवी बोपारा; IPL २०१० मध्ये रवी बोपारा च्या १ षटकात ३३ धावा झाल्या होत्या. हा सामना पंजाब किंग्ज (PBKS) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात ईडन गार्डन्स वर खेळला गेला होता.

View this post on Instagram

A post shared by Ravi Bopara (@ravibopara)

५) हर्षल पटेल: IPL २०२१ मध्ये, चेन्नई सुपर किंग्ज (CSK) च्या रवींद्र जडेजा ने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) चा गोलंदाज हर्षल पटेल च्या १ षटकात ३७ धावा केल्या होत्या. हा सामना मुंबई च्या वानखेडे स्टेडियम वर खेळवला गेला होता.

View this post on Instagram

A post shared by Harshal Patel (@harshalvp23)

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप