आयपीएलमध्ये खराब फॉर्म मुळे फ्लॉप ठरले हे दिग्गज खेळाडू, या यादीत २ भारतीय खेळाडूचाही समावेश..!

इंडियन प्रीमियर लीग ही सध्या सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग आहे. देशी असो वा परदेशी प्रत्येक खेळाडूला या स्पर्धेत खेळून आपला ठसा उमटवायचा असतो. असे काही दिग्गज खेळाडू आहेत, जे इतर टी-२० लीग आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये यशस्वी ठरले आहेत, पण आयपीएल मध्ये अपयशी ठरले आहेत. या लेखात आयपीएलम ध्ये फ्लॉप झालेल्या या दिग्गज क्रिकेटपटूं च्या नावाचा समावेश आहे.

सौरव गांगुली
वनडे क्रिकेट मध्ये ११३६३ धावा करणारा सौरव गांगुली आयपीएल मध्ये फ्लॉप ठरला होता. सौरव गांगुलीचा आयपीएल मध्ये स्ट्राइक रेट फक्त १०६.८१ इतका होता. सौरव गांगुली ने आयपीएल मध्ये ५९ सामन्यात २५.४५ च्या सरासरी ने १३४९ धावा केल्या आहेत. त्याच बरोबर त्याने आयपीएल मध्ये केकेआरचे कर्णधार पद ही भूषवले आहे.

View this post on Instagram

A post shared by Yuvraj Singh (@yuvisofficial)


अॅरॉन फिंच
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील दिग्गज फलंदाजांना आयपीएल मध्ये विशेष कामगिरी करता आलेली नाही. अ ॅरॉन फिंच आयपीएल च्या जवळ पास प्रत्येक फ्रँचायझीचा एक भाग होता परंतु आपल्या फलंदाजीची छाप कधीही सोडू शकला नाही. एरॉन फिंच ने आयपीएल च्या ९२ सामन्यात २४.८९ च्या सरासरी ने आणि १२८.२ च्या स्ट्राईक रेट ने २०९१ धावा केल्या आहेत. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात अॅरॉन फिंचचा स्ट्राईक रेट १४५.२९ इतका आहे.

मार्टिल गुप्टिल
न्यूझीलंडचा सलामी वीर मार्टिल गुप्टिल सध्या च्या सर्वोत्तम T-२० फलंदाजां पैकी एक आहे. मात्र आयपीएल मध्ये किवी सलामी वीरा ने केवळ निराशाजनक कामगिरी केली आहे. मार्टिल गुप्टिल ने आता पर्यंत केवळ १३ आयपीएल सामने खेळले आहेत ज्यात त्याच्या बॅट मधून केवळ २७० धावा झाल्या आहेत.

युवराज सिंग
टी-२० क्रिकेट मध्ये ६ चेंडूत ६ षटकार लगावणाऱ्या युवराज सिंग ला आयपीएल मध्ये तितकेसे यश मिळवता आले नाही. युवराज सिंग ने आयपीएल च्या १३२ सामन्यांत २४.७७ च्या सरासरीने आणि १२९.७२ च्या स्ट्राईक रेटने २७५० धावा केल्या. त्याच बरोबर आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटचा त्याचा विक्रम पाहिला तर तो आयपीएल पेक्षा कितीतरी पटीने सरस असल्याचे लक्षात येईल. युवराज सिंगचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात स्ट्राइक रेट १३६.३८ इतका होता.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप