भारतीय क्रिकेट संघात निवड होणे जितके कठीण मानले जाते तितकेच टीम इंडियात स्वतःला टिकवून ठेवणे तितकेच कठीण आहे, कारण संघाबाहेर असे अनेक खेळाडू आहेत जे त्यांच्या स्फोटक कामगिरीच्या जोरावर खडतर टक्कर देतात. भारतीय संघात असे अनेक खेळाडू आहेत ज्यांचे करिअर खराब वेळेमुळे किंवा संघ निवडकर्त्यांच्या सतत दुर्लक्षामुळे उद्ध्वस्त झाले आहे. या लेखात आम्ही तुम्हाला अशा खेळाडूंबद्दल सांगणार आहोत ज्यांचे क्रिकेट करिअर बीसीसीआयमुळे किंवा निवडकर्त्यांमुळे खराब झाले आहे.
मुरली विजय
२०१८ मध्ये टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला गेली तेव्हा मुरली विजयची फ्लॉप कामगिरी पाहायला मिळाली. या दौऱ्यावर मुरली विजयला लगेचच टीम इंडियातून वगळण्यात आले आणि मयंक अग्रवालला संधी मिळाली. मुरली विजयने त्याचा शेवटचा कसोटी सामना डिसेंबर २०१८ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला होता. यानंतर मुरली विजयने निवडकर्त्यांच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले होते. मुरली विजय म्हणाला होता, कमीतकमी मला का वगळण्यात आलं हे सांगायला हवं. हे विधान मुरली विजयला भारी पडलं आणि त्याला पुन्हा भारताकडून खेळण्याची संधी मिळाली नाही.
View this post on Instagram
अंबाती रायडू
२०१८ मध्ये आयपीएलद्वारे भारतीय संघात महत्त्वाचे स्थान निर्माण करणारा अंबाती रायडू हा एक अनुभवी फलंदाज आणि भारतीय संघाचा अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जात होता. यानंतर त्याच्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर तो एकदिवसीय संघाचाही नियमित भाग बनला. पण २०१९ च्या विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा झाली तेव्हा त्यात रायडूचे नाव नव्हते, जे पाहून सगळेच थक्क झाले. कारण काही वेळापूर्वीच संघ व्यवस्थापनाने त्याला नंबर ४ चा परफेक्ट ऑप्शन सांगितला होता. अंबाती रायुडूने निवड समितीची खिल्ली उडवली आणि लिहिले, मी वर्ल्ड कप पाहण्यासाठी थ्रीडी चष्मा मागवला आहे. या नंतर रायुडूने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतून निवृत्तीही जाहीर केली होती.
अमित मिश्रा
हरियाणाचा महान फिरकी गोलंदाज अमित मिश्रा हा एक दुर्दैवी क्रिकेटपटू होता कारण त्याच्याकडे प्रचंड क्षमता असूनही त्याला भारतीय संघात नियमित सदस्यत्व मिळू शकले नाही. अमित मिश्राने भारतीय क्रिकेट साठी तिन्ही फॉरमॅट मध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. मात्र वयाच्या २० व्या वर्षी पदार्पण केल्यानंतरही मिश्राला कोणत्याही फॉरमॅट मध्ये ५० सामने खेळता आलेले नाहीत. उत्कृष्ट क्षमता असूनही राजकारणामुळे त्याला संघात स्थान मिळू शकले नाही. पण अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग संघात असल्यामुळे त्याला संघातील स्थान कधीच पक्के करता आले नाही. संघ निवडकर्त्यांनी अमितपेक्षा हरभजन आणि अनिलकडे अधिक लक्ष दिले, त्याची क्रिकेट कारकीर्द लहान होती आणि चांगल्या फॉर्म मध्ये असूनही तो चमत्कार करू शकला नाही.