या खेळाडूंनी वेस्ट इंडिज सिरीज चा फायदा घेत आशिया चषक २०२२ मध्ये खेळण्याचा शिक्का केला मोर्तब..!!

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ चांगली कामगिरी करत आहे. टीम इंडिया मालिकेत२-१ ने आघाडीवर आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यावर भारताच्या पाच खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. अशा स्थितीत या खेळाडूंना आशिया कपमध्ये स्थान मिळवने जवळ जवळ निश्चित केले आहे. हे खेळाडू अवघ्या काही चेंडूंमध्ये सामन्याची बाजी पलटू  शकतात मार्ग.

सूर्यकुमार यादव वेस्ट इंडिजविरुद्ध कर्णधार रोहित शर्मासोबत सलामीला आला आणि तिसऱ्या टी-२० सामन्यात त्याने आपल्या खेळाने सर्वांची मने जिंकली. तिसऱ्या सामन्यात सूर्यकुमार यादवने ४४ चेंडूत ७६ धावा केल्या. त्याची फलंदाजी पाहून विरोधी गोलंदाज आश्चर्यचकीत झाले. तो टीम इंडियासाठी मोठा मॅच विनर म्हणून उदयास आला आहे. हा खेळाडू मधल्या फळीत खेळण्याचा मोठा दावेदार आहे.

जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या गोलंदाजांना वेस्ट इंडिज दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली आहे. बुमराहच्या जागी खेळायला आलेल्या अर्शदीप सिंगने चांगली कामगिरी केली आहे. डावाच्या सुरुवातीला तो खूपच मारक दिसत होता. तो अतिशय किफायतशीर गोलंदाजी करत आहे त्यामुळे त्याला हि संधी मिळू शकते. अर्शदीप सिंगने भारताकडून चार टी-२० सामन्यांत चार विकेट घेतल्या आहेत.

IPL २०२२ मध्ये चांगली कामगिरी करून टीम इंडियामध्ये स्थान मिळवणाऱ्या दिनेश कार्तिकने भारताच्या टीमसाठी फिनिशरची भूमिका बजावली आहे. कार्तिक जेव्हा लयीत असतो तेव्हा तो कोणत्याही बॉलिंग लाइनला फाडून टाकू शकतो. कार्तिकने पहिल्या टी-२० सामन्यात १९ चेंडूत ४१ धावा केल्या.

त्याचबरोबर स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत यष्टीरक्षक म्हणून खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. पंत हा तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा नंबर वन यष्टिरक्षक फलंदाज आहे.

भुवनेश्वर कुमार टी-२० क्रिकेटमध्ये नेहमीच यशस्वी ठरला आहे. डावाच्या सुरुवातीला विकेट घेण्यात तो माहीर आहे. भुवनेश्वरला स्विंगचा राजा म्हटले जाते आणि तो विकेटच्या दोन्ही बाजूंनी स्विंग करण्यात माहीर आहे. इतर गोलंदाजांच्या तुलनेत भुवनेश्वरचे चेंडू खेळणे इतके सोपे नाही. तो आशिया चषकात भारतीय गोलंदाजीचे नेतृत्व करताना दिसतो.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप