आयपीएल २०२२ मधील या संघांना मिळाली सर्वात शक्तिशाली ओपनिंग जोडी, स्वबळावर जिंकवू शकतात सामने..!

आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावा मध्ये सर्व फ्रँचायझींनी त्यांच्या आवडीचे खेळाडू खरेदी करून संघाची रणनीती तयार करण्यास सुरुवात केली आहे. काही संघ असे आहेत, ज्यांनी आयपीएल २०२२ च्या लिलावात असे काही बलाढ्य खेळाडू विकत घेतले आहेत, ज्याचा विचार करून इतर संघाला घाम फुटला आहे. आयपीएल २०२२२ च्या अशाच काही संघांबद्दल जाणून घेऊया.

आयपीएल मधील सर्वात यशस्वी संघांबद्दल बोलायचे झाले तर मुंबई इंडियन्सच्या नावा खाली CSK चे नाव येते. या संघाने आतापर्यंत ४ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे आणि पाचव्यांदाही जिंकण्यासाठी आपली रणनीती तयार केली आहे. सीएसकेने यावेळी न्यूझीलंडच्या डेव्हॉन कॉनवेचा संघात समावेश केला आहे आणि कॉनवे आयपीएल २०२२ मध्ये सीएसकेचा रिटेन केलेला खेळाडू ऋतुराज गायकवाड याच्यासोबत ओपन करू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. खरे तर हे दोघेही असे घा’तक खेळाडू आहेत, जे स्वबळावर संघासाठी सामना जिंकू शकतात. ऋतुराज गायकवाडबद्दल बोलायचे झाले तर गेल्या आयपीएल मधील त्याची धडाकेबाज खेळी आठवेल. त्याने आयपीएल २०२१ मध्ये १६ सामन्यांमध्ये ६३६ धावा केल्या होत्या, ज्यामध्ये एका शतकाचाही समावेश होता.

आयपीएल २०२२ मध्ये पदार्पण करणाऱ्या लखनऊ सुपरजायंट्सने टीम इंडियाचा उपकर्णधार केएल राहुलला १७ कोटी रुपयांना कर्णधार म्हणून विकत घेतले आहे. लिलावातही या संघाने देश-विदेशातील चांगले खेळाडू सामील केले आहेत. लखनौने दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक आणि कर्णधार केएल राहुलला सलामीवीर म्हणून ठेवले आहे. दोन्ही खेळाडू शानदार खेळी खेळण्यासाठी ओळखले जातात. गेल्या काही काळापासून केएल राहुल त्याच्या शानदार खेळीसाठी ओळखला जातो. अशा परिस्थितीत हे दोन्ही खेळाडू संघाला आयपीएल २०२२ च्या अंतिम फेरीत नेऊ शकतात.

आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात, दिल्ली कॅपिटल्स देखील चांगले खेळाडू खरेदी केले आहेत. खरे तर यावेळी दिल्ली कॅपिटल्सने ऑस्ट्रेलियन फलंदाज आणि सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला त्यांच्यासोबत जोडले आहे. वॉर्नर आपल्या लयीत असेल तर तो कोणत्याही गोलंदाजा विरुद्ध चांगली फलंदाजी करू शकतो. आयपीएलमध्येही त्याची ध’डाकेबाज फलंदाजी नेहमीच पाहायला मिळते. डेव्हिड वॉर्नरसोबत पृथ्वी शॉ दुसऱ्या बाजूला आहे, ज्यामध्ये सेहवाग आणि सचिनची जोडी दिसत आहे. हा खेळाडू रोहित शर्माप्रमाणेच लांब षटकार मारण्यासाठी ओळखला जातो. यावेळी आयपीएल २०२२ मध्ये या दोघांची सलामीची खेळी दिल्लीकडून क’हर करणार आहे.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप