या तीन भारतीय फलंदाजांनी त्यांच्या शेवटच्या सामन्यात सर्वाधिक धावा केल्या आहेत..!

कोणत्याही क्रिकेटपटूच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना खूप खास असतो. हा असा सामना आहे ज्यामध्ये खेळाडू आपल्या संपूर्ण कारकिर्दीची आठवण करून देतो आणि क्रिकेटला अलविदा करतो. अनेक खेळाडूंनी आपला शेवटचा सामना खूप संस्मरणीय बनवला, तर अनेक खेळाडूंसाठी त्यांच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना तेवढा संस्मरणीय ठरला नाही. अशा तीन भारतीय क्रिकेटपटूं बद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी त्यांच्या शेवटच्या सामन्यात सर्वाधिक धावा केल्या आहेत.

गगन खोडा – ८९ (१२९) वि केनिया: गगन खोडा हा भारताच्या सर्वोत्तम सलामीवीरां पैकी एक होता. या उजव्या हाताच्या सलामीवीराची आंतरराष्ट्रीय कारकीर्द तितकी मोठी नसून खोडाने प्रथम श्रेणीत आपले नाव सिद्ध केले होते. रणजी ट्रॉफीच्या पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावून तो प्रसिद्धीच्या झोतात आला होता. रणजी ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात त्याने २३७ धावा केल्या होत्या. मात्र त्याला भारतीय संघात आपली प्रतिभा सिद्ध करण्याची फारशी संधी मिळाली नाही. त्याला भारता कडून फक्त दोन सामने खेळण्याची संधी मिळाली होती. १९९८ च्या त्रिकोणीय मालिकेत खोडाने १२९ चेंडूत ८९ धावा केल्या होत्या ज्यामुळे भारताने तो सामना जिंकला होता. मात्र त्यानंतर त्याला भारता कडून खेळण्याची संधी मिळाली नाही.

अजय जडेजा – ९३ (१०३) वि.पाकिस्तान: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना नेहमीच हाय व्होल्टेजचा असतो. या दोन संघांच्या सामन्यात नेहमीच एक खेळाडू पुढे येतो. यापैकी एक नाव अजय जडेजाचेही आहे. जडेजाने २००० च्या आशिया चषकादरम्यान भारताची डगमगलेली खेळी सांभाळली होती. जेव्हाही तो भारता साठी फलंदाजी करतो तेव्हा त्याने नेहमीच खेळाचा मार्ग बदलला आहे. त्याच्या शेवटच्या सामन्यातही त्याने असेच काहीसे केले होते. आशिया चषकाच्या पाचव्या सामन्यात त्याने पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करत भारता साठी १०३ चेंडूत ९३ धावांची खेळी खेळली होती, तो सामना भारताने गमावला असला तरी एका क्षणी जडेजाच्या कामगिरीने संघाच्या विजयाच्या आशा वाढल्या होत्या.

राहुल द्रविड – ६९ (७९) वि. इंग्लंड: राहुल द्रविड हा त्याच्या कारकिर्दीत भारतातील सर्वात विश्वासार्ह आणि हुशार खेळाडू होता. द्रविडची टेक्निक आणि फलंदाजीची शैली जगभर प्रसिद्ध राहिली होती. द्रविडने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत दहा हजारांहून अधिक धावा केल्या आणि यादरम्यान त्याने १२ शतके आणि ८३ अर्धशतके केली होती. त्याने शेवटच्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध ७९ चेंडूत ६९ धावा केल्या होत्या. द्रविडने शेवटचा वनडे सामना २०११ मध्ये खेळला होता.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप