इंग्लंड विरुद्ध च्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामना १७ जुलै रोजी मँचेस्टर च्या ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट स्टेडियम वर खेळवला जाणार आहे. पहिल्या दोन सामन्या मध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. सध्या दोन्ही संघां मध्ये १-१ अशी बरोबरी आहे.
त्याच वेळी अंतिम आणि निर्णायक सामन्यातील भारतीय संघाची प्लेइंग-११ पहिल्या दोन सामन्या सारखी असू शकते. पण लॉर्ड्स वरील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात झालेल्या दारुण पराभवा नंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा प्लेइंग-११ मध्ये दोन बदल करू शकतो. ते दोन बदल काय असू शकतात ते जाणून घेऊया.
View this post on Instagram
वनडे क्रिकेट संघात पुनरागमन करणारा शिखर धवन इंग्लंड विरुद्ध च्या पहिल्या वनडेत नाबाद राहिला होता. या सामन्यात रोहित णिआ धवनच्या जोडी ने भारतीय संघाला १० गडी राखून विजय मिळवून दिला होता. त्याच वेळी दुसऱ्या वनडेत शिखर धवनची कामगिरी खराब राहिली होती. तो या सामन्यात ऑफ फॉर्म दिसत होता. जरी त्याने त्याच्या खेळी दरम्यान काही चांगले शॉट्स खेळले, तरीही त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. शिखर धवन हा भारतीय संघाचा वरिष्ठ खेळाडू असून त्याला वेस्ट इंडिज विरुद्ध च्या वनडे मालिके साठी कर्णधार बनवण्यात आले आहे. त्याच बरोबर रविवारी होणाऱ्या अंतिम आणि निर्णायक सामन्यात धवनच्या जागी इशान किशनला संघात स्थान मिळू शकते.
View this post on Instagram
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाची कामगिरी इंग्लंड विरुद्ध विशेष राहिली नाही. पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यां मध्ये भारतीय संघ ज्या प्लेइंग इलेव्हन सोबत खेळला आहे, त्या मध्ये रोहित शर्माने वेगवान गोलंदाजा वर अधिक विश्वास व्यक्त केला आहे. असे असून ही प्रसिद्ध कृष्णाची कामगिरी खराब झाली आहे. याशिवाय दुसऱ्या वनडे (END vs IND) सामन्यात त्याने विरोधी संघा च्या फलंदाजाचा झेल सोडला होता. इंग्लंड विरुद्ध च्या वनडे मालिकेतील अंतिम सामन्या साठी प्रसिद्ध कृष्णा च्या जागी शार्दुल ठाकूरचा संघात समावेश केला जाऊ शकतो. शार्दुल च्या आगमनाने भारताची फलंदाजीही थोडी भक्कम होईल.