रोहित शर्मा कर्णधार झाल्यामुळे हे दोन खेळाडू आहेत दु:खी, हिटमॅनलाही या दोघांना संघात पाहायचे नाही..!

विराट कोहलीने टी-२० कर्णधारपद सोडल्या नंतर बीसीसीआयने त्याला एकदिवसीय कर्णधारपदावरूनही काढले होते. आता विराट फक्त एक खेळाडू म्हणून भारतीय संघात आहे. त्याच्या जागी रोहित शर्माला भारतीय संघाच्या तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार बनवण्यात आले आहे. रोहितच्या हाती कर्णधारपद येताच त्याने संघात नव्या युवा चेहऱ्यांना संधी देण्यास सुरुवात केली आहे. पण जर आपण खेळाडूं बद्दल बोललो तर असे काही खेळाडू आहेत जे रोहितच्या कर्णधारपदावर अजिबात खूश नाहीत. त्याचं कारण म्हणजे रोहितच्या कर्णधारपदामुळे त्यांना संधी मिळत नाही. व त्याच्या नेतृत्वाखाली या खेळाडूंना पुढे संधी मिळणार नाही, असे मानले जात आहे.

ऋतुराज गायकवाड गेल्या आयपीएलपासून सतत चर्चेत आहे, मात्र यादरम्यान त्याच्या नशिबाने त्याला फारशी साथ दिली नाही. कारण दीर्घकाळापासून आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी करणाऱ्या या बलवान खेळाडूला भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हन मध्ये स्थान देण्यात आले नव्हते. त्याने CSK साठी गेल्या मोसमात सर्वाधिक धावा केल्या होत्या. ऋतुराजने CSK साठी १६ सामन्यां मध्ये ६३६ धावा केल्या होत्या.

रोहितच्या नेतृत्वाखाली आता ऋतुराज गायकवाडला संघात संधी मिळणे कठीण असल्याचे मानले जात आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे रोहित इशान आणि केएल राहुलला सलामीला त्याच्या सोबत चांगला समजतो. इतकंच नाही तर रोहित शिखर धवनलाही स्वत:सह ओपनिंगच्या लायक समजत नाही. तो शिखरला जास्त संधी देत ​​नाही. आता अशा परिस्थितीत ऋतुराजची कारकीर्द ठप्प होऊ शकते, असे दिसते. याच कारणामुळे रोहित शर्माचा कर्णधार म्हणून ऋतुराजला जास्त आनंद नाही.

ऋतुराज व्यतिरिक्त आणखी एक सलामीवीर आहे ज्याकडे सर्व बाजूंनी दुर्लक्ष केले जात आहे, या फलंदाजाचे नाव आहे पृथ्वी शॉ शॉची संघात निवड देखील होत नाही. अवघ्या २२ वर्षांचा हा फलंदाज उत्तम सलामीवीर असला तरी गेल्या एक वर्षापासून तो कसोटी संघात स्थान मिळवण्या साठी प्रयत्न करत आहे. जर आपण पृथ्वी शॉकडे बघितले तर त्याला कसोटी संघात येण्यासाठी संधी मिळत नाही.

त्याने शेवटची कामगिरी २०२० मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध केली होती. त्यादरम्यान पृथ्वी दोन्ही डावात फ्लॉप ठरला होता. त्यानंतर पृथ्वीला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्यानंतर इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत पृथ्वीचा संघात समावेश करण्यात आला होता, मात्र त्याला प्लेइंग इलेव्हन मधून बाहेर ठेवण्यात आले होते. आता रोहित च्या कर्णधारपदा मुळे त्याला संघात सामील होणे आणखी कठीण झाले आहे.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप