स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती दिवशी बॉलिवूडचे प्रसिध्द दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी त्यांच्या नूतन चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ असे या चित्रपटाचे नाव असून हा सिनेमा कसा असेल याची पहिली झलक आज रसिक प्रेक्षकांसमोर समोर आली आहे!
दिनांक २८ मे रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती आहे. त्यानिमित्त संपूर्ण देशभरात त्यांच्या सन्मानासाठी अनेक व्याख्यानं आणि वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. म्हणूनच याच दिवसाचे औचित्य साधत शनिवारी एका नव्या चित्रपटाची अधिकृत घोषणा जाहीर करण्यात आली आहे.
View this post on Instagram
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारीत असलेल्या या सिनेमाचे पहिले पोस्टर आणि मोशन पोस्टर प्रदर्शित झाले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून संदीप सिंह आणि अमित वाधवानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. दरम्यान आता नेटकाऱ्यांच्या मनात प्रश्न आला असेल की या एवढ्या मोठ्या चित्रपटात स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका कोणता अभिनेता साकारत आहे? तर वीर सावरकरांची भूमिका तेवढ्याच ताकदीने साकार करण्यासाठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी तेवढ्याच ताकदीच्या गुणी अभिनेत्याची निवड या भूमिकेसाठी केली आहे.
प्रसिध्द बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा हा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटात मुख्य भूमिका निभावताना दिसणार आहे. दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी या सिनेमाचे पोस्टर आणि मोशन पोस्टर सोशल मीडियावर शेअर करत, यातून त्यांनी अभिनेता रणदीप हुड्डाच्या भूमिकेची ओळख चित्रपट प्रेमींना करुन दिली आहे. ‘हिंदूत्त्व धर्म नही, इतिहास हैं’ अशी सणसणीत टॅगलाइन या पोस्टरवर देण्यात आली असून यावरूनच आपल्याला या सिनेमाचा अंदाज येऊ शकतो!
View this post on Instagram
महेश मांजरेकर यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून थोर स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीच्या शुभेच्छा देत या सिनेमात रणदीप हुड्डा मुख्य कलाकार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी हे पोस्टर शेअर करताना असे लिहिले आहे की,
‘सावरकरांबद्दल लोकांच्या मनात वेगवेगळ्या आवृत्त्या असू शकतात पण एक चित्रपट निर्माता म्हणून पण मी सावरकरांच्या विचारांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे चित्रपटाची कथा आणि व्यक्तिरेखा यात सावरकर जसे होते, आहेत आणि राहतील यापेक्षा काही फरक असणार नाही. ते स्वातंत्र्यसैनिक होते आणि त्यांना विसरता येणार नाही.’
यानंतरच अभिनेता रणदीप हुड्डा याने देखील सर्वांना सावरकर जयंतीच्या शुभेच्छा देत सिनेमाचे पहिलेवहिले पोस्टर त्याच्या सोशल मीडिया अकाउंट वरून शेअर केले आहे. यामध्ये त्याने असे म्हटले आहे की,
‘भारताच्या स्वातंत्र्यासाठीच्या आणि आत्म-वास्तविकतेच्या लढ्यातील सर्वोच्च पण ज्यांच्याबाबत खूप कमी ऐकिवात आहे अशा वीरांपैकी एक असणाऱ्याला हा सलाम आहे. मला आशा आहे की एका खर्या क्रांतिकारकाची भूमिका करण्याचे आव्हान मी पेलू शकेन आणि त्यांची खरी कहाणी सांगू शकेन जी दीर्घकाळासाठी दडवून ठेवली गेली होती.’
याच दरम्यान पोस्टर वरील रणदीप हुड्डाच्या या दमदार लुकचे जेवढे कौतुक होत आहे, तेवढेच ही भूमिका स्विकारल्यामुळे त्याच्यावर टीकेची झोड देखील उठली आहे! सोशल मीडियावर या अभिनेत्याला उगीचच ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.