फोटोत दिसणारा हा क्युट ‘चिमुकला’ आज करत आहे बॉलिवूडवर राज्य!

या फोटोत रडणाऱ्या गोंडस चिमुकल्याला ओळखलंत का? आज तो बनला आहे बॉलिवूडचा मोठा स्टार! हा हिरो आज सगळ्या तरूणींच्या गळ्यातील ताईत तर आहेच पण एक टॉपची बॉलिवूड मधली अभिनेत्री त्याच्या प्रेमात आकंठ बुडाली आहे. आजकाल सोशल मीडियावर बॉलिवूड सेलिब्रिटींच्या बालपणीचे अनेक फोटो तुफान व्हायरल होताना दिसतात. याच गर्दीत ह्या छोट्या चिमुरड्याचा फोटोही तुफान व्हायरल झालेला. फोटोत त्याचा रडका चेहराही कमालीचा क्यूट दिसत आहे.

अजुनही जर तुम्ही या चिमुकल्याला ओळखू शकला नसाल तर आम्ही सांगतो. हा दुसरा तिसरा कुणी नसून बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर आहे. होय, नीतू कपूर आणि ऋषी कपूर यांचा लाडका लेक आणि आलिया भटचा रिअल लाईफ हिरो.

रणबीरचे बालपणीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. हा फोटो देखील त्यातलाच एक आहे. रणबीर सोशल मीडिया जास्त वापरत नाही. पण रणबीरची आई नीतू कपूर मात्र सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. रणबीर व आपली लेक रिद्धिमाचे अनेक कॅण्डीड थ्रोबॅक फोटो त्या सतत शेअर करत असतात. सध्या रणबीर कपूर आलियाला डेट करत असल्याच्या चर्चाना उधाण आलंय! लवकरच हे कपल लग्न करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे! ‘ब्रह्मास्त्र’च्या सेटवर रणबीर व आलिया एकमेकांच्या प्रेमात पडले. आणि आता त्यांचं हे नातं लग्नापर्यंत येऊन पोहोचलं आहे.

खरं तर रणबीरला बॉलिवूडचा प्लेबॉय म्हटलं जातं. याला तशी पार्श्वभूमी देखील तशीच आहे. आलिया आयुष्यात येण्याआधी रणबीर कतरिना कैफच्या प्रेमात होता. अगदी तिच्यासोबत तो लिव्ह इनमध्येही राहिलेला. पण त्याच्या मम्मीला कॅट पसंत नव्हती. तिच्या मर्जीखातर म्हणा वा अन्य कुठल्या कारणाने रणबीर हळूच कतरिनाच्या आयुष्यातून दूर निघून गेला. त्याआधी रणबीर दीपिकाच्या प्रेमात पडला होता.

View this post on Instagram

A post shared by Ranbir kapoor 🔵 (@ranbir_kapoooor)

दीपिका आणि रणबीर कपूरच्या प्रेमाच्या चर्चा तर आजही होताना दिसतात. ‘बचना ए हसीनो’ या चित्रपटादरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. दीपिका तर रणबीरसाठी अक्षरश: वेडी झाली होती. पण मधूनच अचानक त्या दोघांचं ब्रेकअप झालं आणि ते वेगळे झाले! यांखेरीज अवंतिका मलिक, अमीषा पटेल, नर्गिस फाखरी, फॅशन डिझाईनर नंदिता महतानी, श्रुती हासन यांच्यासोबतही त्याच्या अफेअरच्या चर्चा एकेकाळी जोरात रंगल्या होत्या. पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिच्यासोबतही रणबीरचे नाव जोडण्यात आलं होतं.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप