रवी शास्त्री हा भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक असताना, संघाने आयसीसीचे विजेतेपद पटकावले नसले तरी भरपूर यश संपादन केले आहे. यामुळेच रवी शास्त्रीचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ हा भारतीय इतिहासातील सर्वोत्कृष्ट नसला तरी नक्कीच सर्वोत्कृष्ट मानला जाईल. शास्त्री यांच्या कार्यकाळात भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत दोनदा पराभूत केले होते. ICC २०१९ विश्वचषक स्पर्धेतील भारतीय संघाचा प्रवास उपांत्य फेरीत संपला होता. भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिप मध्ये उपविजेता ठरला होता.
मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांच्या जोडीने भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर नेले आहे. शास्त्री आणि कोहली यांच्यात खूप जवळचे नाते आहे. आयपीएल मध्ये कोहली फ्लॉप होत असताना शास्त्रीने भारताच्या माजी कर्णधाराला विश्रांतीची गरज असल्याचे सुचवले होते. कोहलीने आपल्या माजी मुख्य प्रशिक्षकाच्या सल्ल्याकडे लक्ष दिले न्हवते.
View this post on Instagram
मात्र, पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतीफने विराट कोहलीच्या खराब फॉर्म साठी रवी शास्त्रीला जबाबदार धरले आहे. कॉट बिहाइंड या यूट्यूब चॅनलवर बोलत असताना लतिफला विचारण्यात आले की, शास्त्रींने विराट कोहलीला विश्रांतीचा सल्ला दिला होता यावर तुला काई वाटते? यावर पाकिस्तानचा माजी कर्णधार म्हणाला, हे सर्व रवी शास्त्रीमुळे होत आहे.
प्रसारकांचा कोचिंगशी काहीही संबंध नाही, असेही तो म्हणाला. २०१४ मध्ये रवी शास्त्रीला दोन वर्षां साठी भारतीय क्रिकेट संघाचा संचालक बनवण्यात आले होते. त्यानंतर २०१७ मध्ये शास्त्रीला मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले होते. २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी नंतर अनिल कुंबळेने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर रवी शास्त्रीची नावा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यापूर्वी रवी शास्त्री हा लोकप्रिय समालोचक होता. शास्त्रीच्या आगमना नंतर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात धमाकेदार कामगिरी केली होती.
रशीद लतीफ म्हणाला, २०१९ मध्ये तुम्ही अनिल कुंबळे सारख्या खेळाडूला बाजूला केले आणि रवी शास्त्री आला. मला माहित नाही की त्याला कोचिंग साठी मान्यता मिळाली की नाही. तो ब्रॉडकास्टर होता. त्याचा कोचिंगशी काहीही संबंध नव्हता. मला खात्री आहे की विराट कोहली वगळता इतरांनी शास्त्रीला प्रशिक्षक बनवण्यात भूमिका बजावली असेल. मात्र आता हा निर्णय उलटला आहे. शास्त्री प्रशिक्षक झाला नसता तर कोहलीचा फॉर्म खराब झाला नसता.