या भारतीय खेळाडूंच्या नावावर आहे कसोटी क्रिकेट मध्ये सर्वाधिक वेळा मॅन ऑफ द सिरीज जिंकण्याचा विक्रम..!

कसोटी क्रिकेट मध्ये राष्ट्रीय संघा कडून खेळणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. कसोटी क्रिकेट ही क्रिकेटपटूची खरी कसोटी असते. भारताचे असे अनेक खेळाडू होते ज्यांनी कसोटी क्रिकेट मध्ये खूप नाव कमावले आहे. आज आम्ही तुम्हाला अशा भारतीय खेळाडूं बद्दल सांगणार आहोत ज्यांना कसोटीत सर्वाधिक वेळा मालिकावीराचा किताब देण्यात आला आहे.

रविचंद्रन अश्विन
या यादीत रविचंद्रन अश्विन चे ​​नाव पहिल्या क्रमांका वर आहे, जो भारता कडून कसोटीत सर्वाधिक वेळा हा किताब जिंकणारा खेळाडू आहे. त्याने आता पर्यंत ९ वेळा मालिकावीराचा किताब पटकावला आहे.

वीरेंद्र सेहवाग
वीरेंद्र सेहवाग हा भारताचा माजी स्फोटक सलामी वीर फलंदाज आहे, जो या यादीत दुसऱ्या क्रमांका वर आहे. सेहवागने कसोटी क्रिकेट मध्ये दोनदा त्रिशतक ठोकले. सेहवागने त्याच्या कारकिर्दीत ५ वेळा कसोटीत मालिका वीराचा किताब पटकावला होता.

सचिन तेंडुलकर
सचिन तेंडुलकर हा भारताचा महान फलंदाज आहे जो या यादीत तिसऱ्या क्रमांका वर आहे. सचिन ने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये १०० शतके ठोकण्याचा मोठा विक्रमही केला आहे. आपल्या कारकिर्दीत ७४ कसोटी मालिकेत सचिनने ५ वेळा मालिकावीराचा किताब पटकावला आहे.

कपिल देव
जवळपास दोन दशके चाललेल्या कारकिर्दीत भारताचे माजी कर्णधार कपिल देवने तब्बल चार मॅन ऑफ द सीरीज पुरस्कार जिंकले आहेत. कपिल देवने भारता साठी १३१ कसोटी खेळल्या, ३८ मालिकांमध्ये भाग घेतला व ५२४८ धावा केल्या आणि ४३४ बळी घेतले आहेत. १९८१ मध्ये जेव्हा इंग्लंडने सहा सामन्यांच्या मालिके साठी भारताचा दौरा केला तेव्हा अष्टपैलू खेळाडूने पहिला मालिकावीर पुरस्कार जिंकला होता. त्याने ३१८ धावा केल्या आणि २२ विकेट्स घेतल्या होत्या म्हणून त्याला हा पुरस्कार देण्यात आला होता.

हरभजन सिंग
हरभजन सिंगने भारतासाठी १०३ कसोटी सामने खेळले आणि २.८४ च्या इकॉनॉमीने ४१७ विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या कारकिर्दीत त्याने तब्बल ४७ मालिकांमध्ये भाग घेतला आणि चार वेळा मालिकावीर पुरस्कार जिंकला आहे. २००१ मध्‍ये ऑस्‍ट्रेलिया विरुद्ध त्‍याने पहिला सामना खेळला होता, जेव्हा त्‍याने तीन सामन्‍यात ३२ विकेट घेतल्या होत्या, त्यात हॅट्‍ट्रिकचा समावेश होता, त्यावेळी भारतीय संघाने मालिका २-० ने जिंकली होती.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप